"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:49 IST2025-06-27T13:47:43+5:302025-06-27T13:49:52+5:30

एका पतीने आपल्या पत्नीवर तब्बल आठवेळा चाकूने हल्ला करत तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Not one or two, my son-in-law has 12 girlfriends, Mother-in-law exposes husband who killed his wife | "एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल

"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल

पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना सध्या उघडकीस येत आहेत. अशातच बिहारमध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर तब्बल आठवेळा चाकूने हल्ला करत तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आता गंभीर जखमी झालेल्या पत्नीच्या आईने आपल्या जावयाबद्दल मोठा खुलासा केला आहे. क्रूर जावयाच्या तब्बल १२ गर्लफ्रेंड असल्याचा दावा सासूने केला.

बिहारमधील लोभी पतीने आपल्या २७ वर्षीय पत्नी संजुला कुमारीवर चाकूने आठ वेळा हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. आरोपी प्रेमराजचे केवळ एक-दोन नव्हे, तर तब्बल १२ विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, तो स्वतः एका सरकारी महामंडळाचा कर्मचारी असूनही जिम उघडण्यासाठी पत्नीकडून ५ लाख रुपयांची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने हे क्रूर कृत्य केले. ही घटना जोगसर पोलीस स्टेशन हद्दीतील कोयलाघाट येथे घडली.

अनैतिक संबंधांमुळे व्हायचे वाद!
संजुला आणि प्रेमराज यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि त्यांना ५ आणि ४ वर्षांची दोन मुले आहेत. प्रेमराजच्या अनेक मुलींशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या घरात नेहमीच वाद होत असत. संजुलाच्या कुटुंबाकडे प्रेमराज आणि त्याच्या १२ मैत्रिणींचे फोटोही आहेत.

गुरुवारी संजुला मुलांना शाळेतून आणायला गेली असताना प्रेमराजने तिला वारंवार फोन करून घरी बोलावले. संजुला घरी पोहोचताच तिची वहिनी ममता कुमारीने तिच्याशी भांडायला सुरुवात केली. त्यानंतर प्रेमराज, त्याचे वडील रामचंद्र यादव आणि आई मुक्ती देवी यांनी संजुलाला एका खोलीत कोंडून प्रथम बेदम मारहाण केली. तिला बेडवर झोपवून गळा दाबण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर क्रूर प्रेमराजने संजुलाच्या शरीरावर वेगवेगळ्या भागांत आठ वेळा चाकूने वार केले. 

कुटुंबालाही मारहाण, पोलीस ठाण्यात बेशुद्ध पडली महिला!
संजुलाने आपल्या आईला, मंजू देवींना, घटनेची माहिती दिली. मंजू देवी आणि भाऊ युवराज यादव ५ किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या माहेरहून घटनास्थळी पोहोचले असता, संजुलाच्या सासरच्यांनी त्यांनाही मारहाण केली. जखमी अवस्थेत संजुला, तिची आई आणि भाऊ जोगसर पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे सुमारे अर्धा तास वाट पाहिल्यानंतर संजुला पोलीस ठाण्यातच बेशुद्ध पडली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिला मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अनैतिक संबंध आणि पैशाची मागणी हेच कारण!
युवराज यादवने सांगितले की, प्रेमराजचे अनेक मुलींशी अवैध संबंध आहेत. तो वारंवार ५ लाख रुपयांची मागणी करत होता. मुलांची जबाबदारी कधीही प्रेमराजने घेतली नाही, ती नेहमी संजुलाच पार पाडत असे. संजुलाने तिच्या पतीला अनेक मुलींसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते, असेही युवराजने सांगितले. मंजू देवींच्या म्हणण्यानुसार, प्रेमराजला पुन्हा लग्न करायचे होते आणि तो संजुलाकडून घटस्फोट मागत होता. जिम उघडण्याच्या नावाखाली तो पैशांची मागणी करून मारहाण करत होता.

चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या संजुलाला ऑपरेशन थिएटरजवळ अर्धा तास वेदनेने तडफडत पडून राहावे लागले, कारण तिथे लाईट नव्हती. ऑपरेशन थिएटरमध्येही अंधार होता. या गंभीर घटनेनंतरही रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Not one or two, my son-in-law has 12 girlfriends, Mother-in-law exposes husband who killed his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.