शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

थोडी थोडकी नाही! ५० सेलिब्रिटींची यादी तयार; एनसीबी फास आवळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 6:11 AM

सिमोन खंबाटा, श्रुती मोदीसह चौघांची एनसीबीकडून सहा तास चौकशी

ड्रग्जचे कनेक्शन मोठ्या पडद्याबरोबर छोट्या पडद्यावर पोहोचल्याचे आतापर्यंत अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांकडील चौकशीतून स्पष्ट झाले आहे. चित्रपट व टीव्हीवर काम करणाऱ्या सुमारे ५० सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्मात्यांचा समावेश असून त्यांना टप्प्याटप्प्याने पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेटबाबत एनसीबीने गुरुवारी फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा व सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीसह टीव्ही कलाकार अबीगेल व सनम जोहर यांची चौकशी केली. सहा तासांच्या चौकशीतून त्यांना बॉलिवूडमधील अमली पदार्थांच्या संबंधांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची चौकशी अपूर्ण असून त्यांना पुन्हा पाचारण केले जाणार आहे.तस्कर अनुज केशवानी व जया साहा यांच्याकडील चौकशीतून बॉलिवूडमधील ड्रग्ज संबंधित अभिनेत्रींची नावे समोर आली. त्याअनुषंगाने फॅशन डिझायनर सिमोन खंबाटाला समन्स जारी केले होते. सिमोन व श्रुती गुरुवारी दुपारी कार्यालयात हजर झाल्या. श्रुतीकडे सुशांत, रिया व अन्य ड्रग्ज तस्करांशी संबंधांबाबत विचारणा करण्यात आली. तर सिमोनकडे पार्ट्यांमध्ये सीबीडी आॅईल आणि ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांबाबत विचारणा करण्यात आली. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. दरम्यान, टीव्ही कलाकार अनीबेल व सनम जोहर यांच्या जुहू येथील घरी बुधवारी छापा टाकला होता. त्यांना चौकशीसाठी कार्यालयात पाचारण केले होते.५० सेलिब्रिटींची यादी तयारड्रग्जचे कनेक्शन मोठ्या पडद्याबरोबर छोट्या पडद्यावर पोहोचल्याचे आतापर्यंत अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांकडील चौकशीतून स्पष्ट झाले आहे. चित्रपट व टीव्हीवर काम करणाºया सुमारे ५० सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्मात्यांचा समावेश असून त्यांना टप्प्याटप्प्याने पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDrugsअमली पदार्थ