Video - धक्कादायक! अवघ्या 4 सेकंदात महिलेची चैन, फोन हिसकावून चोरटा पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 17:13 IST2023-09-12T17:04:31+5:302023-09-12T17:13:25+5:30
एका चोरट्याने भरदिवसा महिलेच्या हातातून फोन आणि चैन हिसकावून पळ काढला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Video - धक्कादायक! अवघ्या 4 सेकंदात महिलेची चैन, फोन हिसकावून चोरटा पसार
नोएडाच्या सेक्टर-34 मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चोरट्याने भरदिवसा महिलेच्या हातातून फोन आणि चैन हिसकावून पळ काढला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे कोतवाली सेक्टर-24 पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. या घटनेवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या.
चोरट्याने मोबाईल आणि चैन हिसकावली आणि पळून गेला. @noidapolice ने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. मोबाईल स्नॅचिंगच्या घटनेसंदर्भात सेक्टर-24 पोलीस स्टेशनद्वारे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई केली जात आहे, एक टीम तयार करण्यात आली आहे. घटनेचा उलगडा लवकरच होईल असं म्हटलं आहे.या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दिन दहाड़े नोएडा में राह चलते युवती का छीना चैन , वीडियो वायरल pic.twitter.com/wT9bWWgSpI
— Priya singh (@priyarajputlive) September 11, 2023
सेक्टर-34 मध्ये राहणारी एक महिला सोमवारी मुख्य रस्त्यावरून पायी आपल्या घरी जात होती, असं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान एक हाफ पँट घातलेला माणूस त्या महिलेच्या मागून आला आणि त्याने पटकन तिच्या हातातील फोन, चैन हिसकावून घेतली आणि मागे पळून गेला.
महिला व इतर लोक त्या चोरट्याला पकडण्यासाठी धावले, मात्र त्याला पकडता आले नाही. पोलिसांनी सांगितलं की असे दिसते की तो फोन, चैन हिसकावून घेणारा व्यसनी आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.