No more than 100 people during the marriage ceremony in Curfew period pda | संचारबंदीदरम्यान विवाह समारंभालाही १०० पेक्षा जास्त वऱ्हाडींना बंदी

संचारबंदीदरम्यान विवाह समारंभालाही १०० पेक्षा जास्त वऱ्हाडींना बंदी

ठळक मुद्देपूर्वनियोजित विवाह संमारंभ हा १०० व्यक्तींसाठी मर्यादित ठेवण्यात यावा, असे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचेही या आदेशामध्ये म्हटले आहे.

ठाणेठाणे शहरात कलम 144 नुसार जमावबंदीनंतर संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या काळात दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झालाच तर ५० व्यक्तींमध्ये अंत्यविधी करण्यात यावा. तसेच पूर्वनियोजित विवाह संमारंभ हा १०० व्यक्तींसाठी मर्यादित ठेवण्यात यावा, असे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी काढले आहेत.


हा मनाई आदेश 23 मार्च रोजी पहाटे 5 ते 31 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. ठाणो शहर पोलीस आयुक्तालयातील खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील, असे कार्यक्रम, समारंभ, सण, उत्सव आणि यात्र, मनोरंजानाचे कार्यक्रम, क्रीडा तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा आदींना मनाई राहणार आहे. आंदोलन, मेळावे, मिरवणूक तसेच देशांतर्गत आणि परदेशी सहलींच्या आयोजनाचाही यात समावेश असल्यामुळे अशा कार्यक्रमांवरही यात बंदी घातली आहे. या काळात खाद्यगृह, खानावळ, शॉपिंग कॉम्पलेक्स, मॉल्स, सूपर मार्केट सर्व मनोरंजनाची ठिकाणो, क्रिडांगणो, मैदाने, सिनेमागृह, शाळा आणि महाविद्यालय आदी सर्व बंद राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचेही या आदेशामध्ये म्हटले आहे.

Web Title: No more than 100 people during the marriage ceremony in Curfew period pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.