Nikki Yadav Case : ना चेहऱ्यावर भीती, ना पश्चाताप… निक्कीच्या हत्येनंतर काही तासांत साहिलनं केलं लग्न, समोर आला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 22:02 IST2023-02-15T22:01:36+5:302023-02-15T22:02:08+5:30

निक्की यादव हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोतकडून सातत्याने मोठे खुलासे होत आहेत.

No fear no regret on his face nikki yadav case Sahil gehlot got married within hours after committing crime see marriage photo | Nikki Yadav Case : ना चेहऱ्यावर भीती, ना पश्चाताप… निक्कीच्या हत्येनंतर काही तासांत साहिलनं केलं लग्न, समोर आला फोटो

Nikki Yadav Case : ना चेहऱ्यावर भीती, ना पश्चाताप… निक्कीच्या हत्येनंतर काही तासांत साहिलनं केलं लग्न, समोर आला फोटो

निक्की यादव हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोतकडून सातत्याने मोठे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने केलेल्या अनेक गैरकृत्यांबाबतही उघडपणे सांगितले आहे. याच दरम्यान काही गैरकृत्यांचे पुरावेही समोर आले आहेत. निक्कीची हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी साहिलने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. आता त्या लग्नाचे फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये साहिल चांगलाच तयार होऊन लग्नासाठी आल्याचा दिसत आहे.

९ फेब्रुवारीच्या रात्री साहिलने त्याची गर्लफ्रेंड निक्की यादवची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह ढाब्यात लपवून ठेवण्यात आला. कुणालाही संशय येऊ नये, म्हणून त्याने आपला फोनही बंद केला होता. मात्र गुप्तचर माहितीवरून पोलिसांना या गुन्ह्याचा सुगावा लागला आणि त्यामुळे अल्पावधीतच आरोपी साहिलला पोलिसांनी अटक केली. साहिलला पाच दिवसांची गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

निक्की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिचा प्रियकर दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याच्या तयारीत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्कीनं तिच्या बॉयफ्रेंडला वॉर्निंग दिली होती. जर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले तर ती त्याला अडकवेल. त्या दबावानंतरच आरोपीने निक्कीच्या हत्येचा कट रचला त्यानंतर हा गुन्हा केल्याचे समजते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कुठलीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. 

आरोपीने स्वत: गुन्हा केला कबुल
विशेष म्हणजे आरोपीने सकाळी त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केली त्यानंतर त्याच संध्याकाळी घरच्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलीशी लग्न केले. चौकशीदरम्यान, आरोपी साहिलने स्वतः सांगितले की, त्याने १० फेब्रुवारी रोजी ISBT, दिल्लीजवळ एका कारमध्ये निक्कीचा गळा दाबून खून केला होता, खून केल्यानंतर तो मृतदेहासोबत कारमध्ये फिरत राहिला, त्यानंतर त्याने ढाब्याच्या फ्रीजमध्ये मृतदेह लपविला. 

Web Title: No fear no regret on his face nikki yadav case Sahil gehlot got married within hours after committing crime see marriage photo