शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nithari murder: सीबीआय कोर्टाने सुरेंद्र कोळीला ठरवले दोषी, १९ मेला शिक्षा सुनावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 18:46 IST

Nithari murder : मिळालेल्या माहितीनुसार, आता न्यायालय 19 मे रोजी दोषींना शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणी गाझियाबाद सीबीआय कोर्टात सुरू होते.

गाझियाबाद : निठारी हत्याकांडप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. बडी पायलच्या हत्येप्रकरणी सुरेंद्र कोळीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याचवेळी मोनिंदर सिंग पंढेर हे मोरल ट्रॅफिकिंग कायद्यान्वये दोषी आढळले आहेत. तर सिमरनजीत कौरची भ्रष्टाचार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आता न्यायालय 19 मे रोजी दोषींना शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणी गाझियाबाद सीबीआय कोर्टात सुरू होते.2017 मध्ये देखील गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाने पिंकी सरकार हत्या प्रकरणात सुरेंद्र कोळी आणि पंढेर यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यापूर्वी गाझियाबाद येथील विशेष न्यायालयाने व्यापारी मोनिंदर सिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोळी यांना निठारी हत्याकांडात दोषी ठरवले होते. सुरेंद्र कोळी आणि मोनिंदर पंढेर यांना न्यायाधीश पवन कुमार तिवारी यांनी फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण पिंकी सरकारच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणात पंढेर आणि कोळी हे अपहरण, बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात दोषी आढळले होते.

सोसायटीत घुसून बाथरूमध्ये आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ बनवणाऱ्यास पकडले

काय प्रकरण आहे?2006 मध्ये जेव्हा निठारी प्रकरण उघडकीस आले तेव्हा देशभरात या क्रूर प्रकरणाची चर्चा जोरदार रंगली होती. नोएडातील निठारी गावातील कोठी क्रमांक डी-5 मधून सांगाडे मिळू लागल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान मानवी हाडांचे काही भाग आणि अशी ४० पाकिटे सापडली, ज्यामध्ये मानवी अवयव भरून नाल्यात फेकण्यात आले होते.कोण आहे सुरेंद्र कोळी?सुरेंद्र कोळी हा उत्तराखंडचा रहिवासी असून तो मोनिंदर सिंग पंढेरच्या घरी कामाला होता. पंढेर यांचे कुटुंब 2004 मध्ये पंजाबला गेले तेव्हा घरात फक्त पंढेर आणि कोळी राहत होते. मग याच बंगल्यात दोघांनी केलेल्या खून आणि बलात्कारासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

टॅग्स :Nithari killingsनिठारी हत्याकांडCourtन्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस