Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 07:12 PM2020-03-06T19:12:26+5:302020-03-06T19:18:16+5:30

Nirbhaya Case : आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Nirbhaya Case: old advocate fired ; The convict filed a curative petition again pda | Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल

Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल

Next
ठळक मुद्देमुकेशचे वकील एम. एल. शर्मा यांनी भारत सरकार, दिल्ली सरकार आणि एमीकस क्युरी यांना प्रतिवादी बनविले आहे. इतर कायदेशीर बाबींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली -निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा २० मार्चला देण्यात येणार असतानाच या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. निर्भयाचा दोषी मुकेश कुमार सिंहने आपल्या जुन्या वकिलावर खापर फोडत पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुकेशने दावा केला की, क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी होता याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. कारवाई रद्द करावी, क्युरेटिव्ह याचिका दाखल करणे आणि इतर कायदेशीर बाबींचा वापर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी आता मुकेशच्या वकील एम. एल. शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

मला माझ्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले
मुकेशचे वकील एम. एल. शर्मा यांनी भारत सरकार, दिल्ली सरकार आणि एमीकस क्युरी यांना प्रतिवादी बनविले आहे. अर्जात म्हटलं आहे की, मुकेशला या प्रकरणात जाणूनबुजून अडकविल्याचा प्रयत्न केला जात आहे. लिमिटेशन ऍक्टनुसार मुकेशला क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असतो याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याला मुलभूत अधिकारापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याने रिट याचिका दाखल केली आहे.

तीन वर्षापर्यंत दाखल करू शकतो क्युरेटिव्ह याचिका
एम. एल. शर्माने दाखल केलेल्या अर्जात लिमिटेशन ऍक्टच्या कलम १३७ नुसार याचिका दाखल करण्याचा कालावधी ठरवला जातो. त्यात तीन वर्षांचा वेळ दिला जातो. अशा प्रकारे क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी आहे असे नमूद करण्यात आले आहे.

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

 

Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना



दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारही दोषींना २० मार्चला पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. या चार दोषींविरोधात नव्याने चौथे डेथ वॉरंट काल जारी करण्यात आले आहे. त्यातच या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण मुकेशची फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर तीन वर्षापर्यंत त्याला क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची वेळ होती. ही वेळ जुलै २०२१ पर्यंत आहे. एमीकस क्युरीने बळजबरीने वकालतनाम्यावर सही केली आणि क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. सरकारचं कर्तव्य आहे की, त्यांनी कायद्याचं पालन केले पाहिजे. कारण मुकेशला कायदेशीर बाबींपासून वंचित राहवं लागत आहे. 

Web Title: Nirbhaya Case: old advocate fired ; The convict filed a curative petition again pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.