Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:21 PM2020-03-06T17:21:23+5:302020-03-06T17:24:51+5:30

Nirbhaya Case : थोड्या वेळासाठी तुरूंगातील कर्मचार्‍यांनी दोषींशी बोलून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

As the last death warrant was issued, the culprits sat down in scare, and the night was over pda | Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना

Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना

Next
ठळक मुद्देचारही दोषींना फाशीच्या चौथ्या डेथ वॉरंटबाबत माहिती समजताच त्यांचे समुपदेशन व वैद्यकीय तपासणी घेण्यात आली.गुन्हेगारांनी फाशी देण्यास उशीर करण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्तीचा वापर केला आणि संपूर्ण यंत्रणेची चेष्टा केली आहे. 

नवी दिल्ली -  कोर्टाकडून फाशीचे वॉरंट मिळताच निर्भयाच्या चारही दोषींची झोप उडाली आहे. चारही दोषींना फाशीच्या चौथ्या डेथ वॉरंटबाबत माहिती समजताच त्यांचे समुपदेशन व वैद्यकीय तपासणी घेण्यात आली. थोड्या वेळासाठी तुरूंगातील कर्मचार्‍यांनी दोषींशी बोलून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.


कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषींना जेव्हा कळलं की फाशी आता निश्चित झाली आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आणि घाबरलेले होते. कारागृह प्रशासनानेही त्यांची सुरक्षा वाढविली असून दोषींची वैद्यकीय तपासणी सातत्याने केली जात आहे. कारागृहातील सूत्रांनी सांगितले की, चार आरोपींचे वैद्यकीय अहवाल चांगले आहेत. तुरुंग प्रशासनाने बुधवारी डेथ बजावण्यासाठी कोर्टात गेल्यानंतर दोषींची रात्री संपता संपत नव्हती. रात्री अचानक दोषी झोपेतून मध्येच जागे होत असत. येथे तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी सतत त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. 

Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी

 

Nirbhaya Case : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

 

Nirbhaya Case : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली


तुरुंगातील कर्णाचारी दोषींशी  बोलून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण याआधी दोषी विनयने स्वत: ला नुकसान करून घेत डोकं भिंतीवर आपटून घेतले होते. त्यामुळे त्यावर विशेष देखरेख ठेवली जात आहे. २३ मार्च रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती आर भानुमति, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस बोपन्ना यांच्या खंडपीठाला सांगितले की खटल्याच्या न्यायालयाने फाशीसाठी 20 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भात खंडपीठाने म्हटले आहे की, "23 मार्च रोजी आम्ही सुनावणी घेत असलो आणि त्यादरम्यान दोषींना फाशी दिली. त्यात काही हरकत नाही." आम्ही केवळ कायदेशीर बाबींचा विचार करू. यापूर्वी मेहता म्हणाले की, गुन्हेगारांनी फाशी देण्यास उशीर करण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्तीचा वापर केला आणि संपूर्ण यंत्रणेची चेष्टा केली आहे. 

Web Title: As the last death warrant was issued, the culprits sat down in scare, and the night was over pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.