शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Nirbhaya Case : तिहार तुरुंगात चौघांना एकत्र फासावर लटकवून 'हा' जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 6:39 PM

२२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फासावर लटकवले जाणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरु आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील मेरठ या शहरातील एका व्यक्तीला वारसा म्हणून घराण्याचे परंपरेने चालत आलेले 'जल्लाद'चे काम मिळाले आहे. १९५० - ६० च्या दशकात या कुटुंबातील पहिल्या पिढीचे प्रमुख लक्ष्मण हे देशातील दोषींना फाशी देण्याचं काम करत होते.

मेरठ - पूर्वजांचा वारसा म्हणून कोणाला संपत्ती मिळते तर कोणाला चांगले संस्कार मिळतात. उत्तर प्रदेशातील मेरठ या शहरातील एका व्यक्तीला वारसा म्हणून घराण्याचे परंपरेने चालत आलेले 'जल्लाद'चे काम मिळाले आहे. अशी चर्चा आहे की, याच कुटुंबातील पवन जल्लादची ही चौथी पिढी तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी देणार आहे. २२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फासावर लटकवले जाणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरु आहे.

देशात या कुटुंबातल्या लोकांना जल्लादांचं कुटुंब म्हणून ओळखले जाते. १९५० - ६० च्या दशकात या कुटुंबातील पहिल्या पिढीचे प्रमुख लक्ष्मण हे देशातील दोषींना फाशी देण्याचं काम करत होते. आता त्यांचा पणतू म्हणजेच लक्ष्मण यांचा मुलगा कालू राम जल्लाद यांच्या मुलाचा मुलगा पवन जल्लाद म्हणजेच या कुटुंबाची चौथी पिढी आयुष्यातली पहिली फाशी देण्याची तयारी करण्यात व्यस्त आहे.पाच दोषींच्या फाशीची आजोबांना केली होती मदत

पवन जल्लादने याआधी जवळपास पाच फाशींमध्ये आजोबा कालू राम जल्लाद यांची मदत केली होती. त्या पाच फाशींच्या वेळी पवन यांनी फाशी देण्याच्या प्रक्रियेतले सर्व बारकावे आजोबा कालू राम यांच्याकडून शिकून घेतले होते. आता निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवणं हा पवन जल्लादसाठी पहिलाच अनुभव असणार आहे.

हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वादपवन जल्लाद म्हणाले की,  'मी तयार आहे. हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. पूर्वजांनी आयुष्यात एका वेळीच एका किंवा दोन दोषींना फाशी दिली होती. मी माझ्या आयुष्यात पहिल्याच वेळी एकत्र चार-चार दोषींना फासावर लटकवणार आहे.'

Nirbhaya Case: 'मी पाच मुलींचा बाप, निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवून समाधान मिळेल': जल्लाद पवनचार दोषींना एकत्र फाशी देण्याची संधी 

तिहार तुरुंगाच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासात आजतागायत कोणत्याही जल्लादने एकत्र चार - चार दोषींना फाशी दिलेली नाही. त्यामुळे हे पवन जल्लादच्या नशिबी आल्याने ते खुश आहेत. 

 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपUttar Pradeshउत्तर प्रदेशjailतुरुंग