Nirbhaya Case : फाशी नको, आजीवन कारावास द्या, निर्भयाच्या 'या' दोषीची उपराज्यपालांकडे विनवणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 06:04 PM2020-03-09T18:04:50+5:302020-03-09T18:10:30+5:30

निर्भयाच्या चार दोषींनी यापूर्वीच त्यांचे सर्व कायदेशीर पर्याय वापरले आहेत.

Nirbhaya Case: Do not be hanged, sentenced to life imprisonment; now this convict approached to delhi Lieutenant Governor pda | Nirbhaya Case : फाशी नको, आजीवन कारावास द्या, निर्भयाच्या 'या' दोषीची उपराज्यपालांकडे विनवणी 

Nirbhaya Case : फाशी नको, आजीवन कारावास द्या, निर्भयाच्या 'या' दोषीची उपराज्यपालांकडे विनवणी 

Next
ठळक मुद्देवकील ए.पी. सिंग यांनी सीआरपीसीच्या कलम ४३२ आणि ४३३ अंतर्गत फाशीची शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. दोषी आरोपी विनयने फाशीची शिक्षा टाळण्यासाठी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे विनवणी केली आहे.

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणात दोषी ठरलेल्या विनय शर्मा याने आता फाशी होऊ नये म्हणून नवी शक्कल लढवली आहे. दोषी आरोपी विनयने फाशीची शिक्षा टाळण्यासाठी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे विनवणी केली आहे. विनय शर्माने आपले वकील ए.पी. सिंग यांच्यामार्फत उपराज्यपाल अनिल बैजल यांना फाशीची शिक्षा आजीवन तुरूंगवासात बदलण्यास विनवणी केली आहे. 

Nirbhaya Case : जुन्या वकिलावर फोडले चुकीचे खापर; या दोषीने पुन्हा केली क्युरेटिव्ह याचिका दाखल

 

Nirbhaya Case : अखेरचा डेथ वॉरंट जारी होताच दोषींची दातखिळी बसली, रात्रही संपता संपेना

 

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वकील ए.पी. सिंग यांनी सीआरपीसीच्या कलम ४३२ आणि ४३३ अंतर्गत फाशीची शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केले असून चार दोषींना फाशी देण्यासाठी २० मार्चची तारीख निश्चित केली आहे. सर्व दोषींना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात येईल. दरम्यान, चौथ्यांदा डेथ वॉरंट जरी केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी निर्भया प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या मुकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच राष्ट्रपतींच्या दया याचिकेसाठी परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालय यावर १६ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. निर्भयाच्या चार दोषींनी यापूर्वीच त्यांचे सर्व कायदेशीर पर्याय वापरले आहेत.

Web Title: Nirbhaya Case: Do not be hanged, sentenced to life imprisonment; now this convict approached to delhi Lieutenant Governor pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.