अभिनेत्रीला दाखवला बंदुकीचा धाक अन् लंपास केले ७ लाख; म्हणाली, बलात्कार होईल अशी वाटत होती भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 13:16 IST2021-09-15T13:16:27+5:302021-09-15T13:16:51+5:30

अभिनेत्री निकिता रावल हिला भयानक अनुभवाचा सामना करावा लागला.

Nikita Rawal robbed of Rs 7 lakh at gunpoint in Delhi, dreaded getting raped | अभिनेत्रीला दाखवला बंदुकीचा धाक अन् लंपास केले ७ लाख; म्हणाली, बलात्कार होईल अशी वाटत होती भीती

अभिनेत्रीला दाखवला बंदुकीचा धाक अन् लंपास केले ७ लाख; म्हणाली, बलात्कार होईल अशी वाटत होती भीती

अभिनेत्री निकिता रावल हिला भयानक अनुभवाचा सामना करावा लागला. नवी दिल्ली येथे तिच्या घरात घुसून चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत ७ लाख रुपये लुटले. काही अज्ञात व्यक्ती चेहऱ्यावर मास्क लावून तिच्या घरात घुसले अन् तिला बंदी बनवलं. निकीता ही दिल्लीच्या शास्त्री नगर येथील तिच्या काकीच्या घरी राहत होती. निकीता शूटींगसाठी दिल्लीत आली आहे आणि घरात एकटी असताना ही घटना घडली. या धक्क्यातून बाहेर पडणं अवघड असल्याचे तिने सांगितले. तसेच, ते चोर  बलात्कार करतील अशी भीतीही तिला वाटत होती आणि त्यामुळे तिनं स्वतःला कपाटात बंद करून घेतले. तिनं याप्रकरणी पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे.

Pinkvilla शी बोलताना निकीता म्हणाली, या धक्क्यातून मी अजूनही बाहेर पडलेली नाही आणि मी जीवंत आहे, यावरही विश्वास बसत नाही. मी संघर्ष केला नसता तर कदाचित मी जीवंत राहिली नसती. जीव वाचवण्यासाठी मी स्वतःला कपाटात बंद करून घेतले. मी घरी एकटीच होती. माझ्या आयुष्यातील हा सर्वात धक्कादायक प्रसंग होता.'' 


या घटनेनंतर निकीता तातडीनं मुंबईत तिच्या घरी परतली. ''रात्री १० वाजत्याच्या सुमारास हा प्रसंग घडला. तेव्हा मास्क घालून चार व्यक्ती माझ्या घरी आले आणि त्यांनी मला बंदूक दाखून स्वतः जवळील सर्व वस्तू देण्यास सांगितले. मी रडत होते. या प्रसंगाबद्दल बोलतानाही मला त्रास होत आहे. मला वाटलं ते माझा जीव घेतील आणि मला भीती वाटत होती की, ते माझा बलात्कार करतील. त्यांनी माझ्याजवळील सर्व वस्तू चोरल्या. मी लगेच माझ्या मुंबईच्या घरी परतली आहे,''असे ती म्हणाली. 


निकीताची अंगटी, घड्याळ, कानातले, डायमंड पेंडंट आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. निकीतानं मी. हॉट, मी. कूल, दी हिरो अभिमन्यू व अम्मा की बोली या चित्रपटांत काम केले आहे.  

Web Title: Nikita Rawal robbed of Rs 7 lakh at gunpoint in Delhi, dreaded getting raped