शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांच्या कोकेनसह नायजेरियनला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:57 IST

रस्त्यावर पाऊण तास चाललेल्या झटापटीनंतर अटक, दोन पोलीस जखमी

ठळक मुद्दे ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील.

नालासोपारा - विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरात रविवारी एक नायजेरियन अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वसई एलसीबीच्या टीमला मिळाल्यानंतर सदर ठिकाणी सापळा रचून लाखो रुपयांच्या कोकेनसह नायजेरियनला पकडले असून पोलिसांना त्याला पकडण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. रस्त्यावर 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी पाऊण तास झटापटी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली पण आरोपीने दोन पोलिसांसह एका खाजगी माणसाचा चावा घेतला आहे. त्याच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ शहरात मिळाल्याने सर्वत्र खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.एलसीबीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी दिलेल्या माहितीनुसार विरार पूर्वेकडील मनवेल पाडा परिसरातील मोहक सिटीजवळील साई कृपा हॉटेलच्या इथे एक नायजेरियन लाखो रुपयांचे कोकेन विकायला येणार असल्याची माहितीदाराने माहिती दिली होती. या माहितीनंतर एलसीबीच्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. रात्रीच्यावेळी एक नायजेरियन सदर ठिकाणी आल्यावर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण पाऊण तासाच्या झटापटीनंतर त्याला पकडण्यात यश आले. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 10 लाख रुपये किंमतीचे 100 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. चिमा इबे इव्हे (26) असे आरोपी नायजेरियन नाव असून तो नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातच राहतो. या झटापटीत एलसीबीचे रमेश अलदर याच्या हाताला दोन ठिकाणी, विकास यादव याच्या हाताला एका ठिकाणी तर खाजगी माणसाच्या हाताचा चावा घेतला आहे.नालासोपारा शहरात पूर्व आणि पच्छिम विभागातील दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोकांचा जणू अड्डाच बनला आहे. तुळींज आणि नालासोपारा पोलीस स्टेशन अंतर्गत अंदाजे 2 ते 3 हजार नायजेरियन लोक राहत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. पोलीस प्रशासन यांच्यावर वेळीच कारवाई करत नसल्यामुळे यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असल्याचीही चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होत आहे. जर वेळीच नायजेरियन यांच्याविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतील.

टॅग्स :ArrestअटकVirarविरारDrugsअमली पदार्थPoliceपोलिस