लाखोंच्या कोकेनसह नायजेरियनला अटक; अंधेरी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 22:45 IST2021-09-03T22:44:04+5:302021-09-03T22:45:02+5:30

Nigerian arrested : अंधेरी पोलिसांनी ही कारवाई केली असुन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.

Nigerian arrested with millions of cocaine; Andheri police action | लाखोंच्या कोकेनसह नायजेरियनला अटक; अंधेरी पोलिसांची कारवाई

लाखोंच्या कोकेनसह नायजेरियनला अटक; अंधेरी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देअंधेरीच्या गुंदवली सर्व्हिस रोड समोर पोलीस निरीक्षक हसबे आणि दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाकडून गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास गस्त घालण्यात येत होती.

मुंबई: लाखो रुपयांच्या कोकेनसह नायजेरियन नागरिकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. अंधेरीपोलिसांनी ही कारवाई केली असुन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.

अंधेरीच्या गुंदवली सर्व्हिस रोड समोर पोलीस निरीक्षक हसबे आणि दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाकडून गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी एक इसम हातात प्लास्टिकची पिशवी घेऊन संशयास्पदरित्या फिरताना त्यांना दिसला. तेव्हा त्यांनी इसमाला अडवत त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे १११ ग्रॅम कोकेन पोलिसांना सापडले. ज्याची किंमत जवळपास ७ लाख ७७ हजार रुपये असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी सांगितले. त्याचे नाव ख्रिश्चन चुगुवा (४६) असून नालासोपारा येथे ९० फिट रोड परिसरात तो राहतो. परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त  डॉ महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांनी हे अंमली पदार्थ ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला आहे. 

Web Title: Nigerian arrested with millions of cocaine; Andheri police action