कोकेनसह एका नायजेरियनला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:05 IST2019-08-06T21:04:05+5:302019-08-06T21:05:35+5:30

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

A Nigerian arrested with cocaine | कोकेनसह एका नायजेरियनला अटक 

कोकेनसह एका नायजेरियनला अटक 

ठळक मुद्देनायजेरियन प्रवाशी अनयो जोयेबेस्ट आच्यो (५२) याला ताब्यात घेऊन झडती घेतलीवसई न्यायालयात हजर केले असता ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका हॉटेलच्या ठिकाणी नायजेरियन अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीने कोकेनसह आरोपीला पकडले आहे. वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कोणाला विकण्यासाठी आला किंवा याचे कोणी साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहे. 

महामार्गावरील एका ठिकाणी अमली पदार्थ विकायला येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाल्यावर सापळा रचून गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास किंग रिसॉर्टच्यासमोरील रस्त्यावर सेट्रो कार (नंबर एम एच०१ ए टी ६४०७) उभी असताना त्यातील नायजेरियन प्रवाशी अनयो जोयेबेस्ट आच्यो (५२) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता अडीच लाखांचे 25 ग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त करून त्याला अटक केले आहे. वसई न्यायालयात हजर केले असता ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Web Title: A Nigerian arrested with cocaine