नववधूची इमारतीच्या गच्चीवर गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 20:46 IST2018-08-20T20:45:53+5:302018-08-20T20:46:22+5:30
ही घटना काल सायंकाळी घडली तर रात्री उशिरा एका हॉटेल व्यावसायिकाने देखील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे मुलुंड परिसरात २४ तासात दोन आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

नववधूची इमारतीच्या गच्चीवर गळफास घेऊन आत्महत्या
मुंबई - मुलुंड पश्चिमेकडील डम्पिंग रोडवर असलेल्या १२ मजली इमारतीच्या गच्चीवर गळफास लावून आरती तपाडे या नवविवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे १ ऑगस्ट रोजी आरती आणि प्रशांत तापाडे यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, यांच्या या प्रेमविवाहाला प्रशांतच्या घरच्यांचा विरोध होता. तरीदेखील दोघांनी विरोधाची पर्वा न करता १ ऑगस्टला लगीनगाठ बांधली होती. मात्र, अवघ्या काही दिवसातच आरतीने गळफास लावून आत्महत्या केली. आरतीने हे पाऊल का उचलले याचा तपास पोलिस करत आहे. ही घटना काल सायंकाळी घडली तर रात्री उशिरा एका हॉटेल व्यावसायिकाने देखील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे मुलुंड परिसरात २४ तासात दोन आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्याने खळबळ माजली आहे.