शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जुन्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 4:22 PM

साहेबराव गुलाबराव सरनाईक असे मृतकाचे नाव असून, योगेश गणपतराव सरनाईक असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देसाहेबराव सरनाईक व त्याचा पुतण्या योगेश सरनाईक यांच्यात जुना वाद होता.दोघांमध्ये हाणामारी होत पुतण्या योगेशने काका साहेबराव सरनाईक यांच्यावर कुऱ्हाडीचे वार केले.यामध्ये साहेबराव सरनाईक हे गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाले.  

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : जुना वाद उफाळून पुतण्याने कुऱ्हाडीने मारहाण करून काकाची हत्या केल्याची घटना रिसोड तालुक्यातील हिवरापेन येथे ७ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. साहेबराव गुलाबराव सरनाईक असे मृतकाचे नाव असून, योगेश गणपतराव सरनाईक असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाºया हिवरापेन येथे मृतक साहेबराव सरनाईक व त्याचा पुतण्या योगेश सरनाईक यांच्यात जुना वाद होता. या वादावरून ७ जून रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान बोलाचाल झाली. पाहता-पाहता दोघांमध्ये हाणामारी होत पुतण्या योगेशने काका साहेबराव सरनाईक यांच्यावर कुऱ्हाडीचे वार केले. यामध्ये साहेबराव सरनाईक हे गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाले.  घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे, पोलीस उपनिरीक्षक शरद साठे, बीड जमादार विनोद चव्हाण, महादेव चव्हाण, विनोद जायभाये यांनी घटनास्थळावर जाऊन योगेंद्र सरनाईक यास अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMurderखून