विवाहबाह्य संबंधात शेजाऱ्याने घातले तोंड, राग मनात ठेवून चाकूने केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 22:11 IST2020-06-12T22:10:27+5:302020-06-12T22:11:27+5:30

गोवंडी येथे एका इसमाची हत्या, आरोपीला अटक

Neighbors put their mouths in an extramarital affair, stabbed each other with anger | विवाहबाह्य संबंधात शेजाऱ्याने घातले तोंड, राग मनात ठेवून चाकूने केले सपासप वार

विवाहबाह्य संबंधात शेजाऱ्याने घातले तोंड, राग मनात ठेवून चाकूने केले सपासप वार

ठळक मुद्देमोहम्मद शेख (२९) असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडीच्या म्हाडा कॉलनीतील बिल्डिंग क्रमांक ४ मध्ये राहतो.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी शेख यास अटक केली आहे.

मुंबई : विवाहबाह्य संबंधास हरकत घेतल्याचा राग मनात ठेऊन गोवंडी येथे एकाने झुल्फिकार चौधरी (५५) या इसमास चाकूने वार करून ठार मारले. मोहम्मद शेख (२९) असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडीच्या म्हाडा कॉलनीतील बिल्डिंग क्रमांक ४ मध्ये राहतो. 

आरोपीच्या विवाहबाह्य संबंधांस त्याच्या शेजारील इमारतीत राहणाऱ्या चौधरी यांनी आक्षेप घेतला होता. याचाच राग मनात ठेवत शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास इमारतीच्या मोकळ्या जागेत आरोपीने चौधरी यांच्या छातीवर, पोटावर व हातावर चाकूने सपासप वार केले. तसेच चौधरी यांच्या दोन मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी चौधरी यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी शेख यास अटक केली आहे.

Web Title: Neighbors put their mouths in an extramarital affair, stabbed each other with anger