घरी बनवलं होतं मटण, पती पत्नीचं झालं भांडणं, शेजारी मिटवायला आले अन् जे झाले ते भयंकर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 13:37 IST2022-10-20T13:36:08+5:302022-10-20T13:37:54+5:30
मध्यप्रदेशमध्ये पती पत्नीच्या भांडणात शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी भोपाळमधून ही घटना समोर आली आहे.

घरी बनवलं होतं मटण, पती पत्नीचं झालं भांडणं, शेजारी मिटवायला आले अन् जे झाले ते भयंकर...
मध्यप्रदेशमध्ये पती पत्नीच्या भांडणात शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी भोपाळमधून ही घटना समोर आली आहे. एका दाम्पत्यामध्ये मटण बनवण्यावरुन भांडण झाले होते. पती- पत्नीला मारहाण करत होता, यावेळी पत्नीने आरडा-ओरड सुरू केला. यावेळी भांडण मिटवण्यासाठी शेजारी पोहोचले, यावेळी यात शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या पती पत्नीची भांडणे मिटवण्यासाठी शेजारी घरी आला. या शेजाऱ्याचे नाव बल्लू असं होते. तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करुन पुन्हा त्याच्या घरी गेला. काही वेळाने महिलेचा पती पप्पू हा काठी घेऊन बल्लूच्या घरी आला आणि त्याने त्याच्यावर काठीने हल्ला केला. बल्लूच्या डोक्यावर काठी लागल्याने तो गंभीर जखमी झाला,काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी पप्पू घटनास्थळावरून फरार झाला.
बलात्कारातील आरोपी मास्तरने स्वत:चीच चिता रचली; फोटोशूट करून न्यायालयातून सुटला, पुढे अडकला
पप्पूची पत्नी कुंतीबाई यांनी फोन करून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पप्पूला काही वेळातच अटक केली. मंगळवारी मटण बनवण्यावरुन दोघांत भांडण झाल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपीने भांडण मिटवायला आलेल्या शेजाऱ्याला रागात काठीने मारहाण केली. यात त्या शेजाऱ्याचा मृत्यू झाला. आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरून बल्लूला अटक करण्यात आली आहे. तो मजुरीचे काम करतो आणि मंगळवारी मटण बनवण्यावरून पत्नी व पत्नीमध्ये भांडण झाले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोस्टमार्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.