शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नीटच्या रॅकेटचे धागेदोरे नागपुरात; CBI चौकशीतून पोलखोल, ५० लाखांच्या बदल्यात मेडिकल प्रवेशाचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 07:29 IST

रॅकेटचा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार याच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर– लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा (NEET exam) उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचा सीबीआयने भंडाफोड केला आहे. या रॅकेटचे धागेदोरे थेट नागपुरात सापडले असून शहरातील आर.के.एज्युकेशन या खाजगी संस्थेमार्फत हा गोलमाल सुरू होता. या रॅकेटचा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार याच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपुरातील आर.के.एज्युकेशन करिअर गायडन्स या संस्थेमार्फत हा सर्व प्रकार सुरू होता. सीबीआयने यासंदर्भात काही दिवसांअगोदर छापेदेखील टाकले होते. यानंतर कोतपल्लीवार व त्याच्या सहकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली होती. कोतपल्लीवारने दिलेल्या माहितीनंतर हा धक्कादायक खुलासा झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरले जायचे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश होईल व त्याबदल्यात ५० लाख रुपये द्यावे लागतील अशी डील व्हायची. संबंधित विद्यार्थ्याच्या बदल्यात डमी उमेदवार परीक्षा द्यायचा. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पालकांनी जमा केली कागदपत्रे -सीबीआयने केलेल्या चौकशीत पालकांनी कोतपल्लीवारकडे पोस्ट डेटेड धनादेश तसेच विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची मूळ गुणपत्रिकादेखील जमा केल्याचे आढळून आले. ५० लाख रुपये भरल्यावर मुळ कागदपत्रे परत करण्यात येणार होते. पालकांनी विद्यार्थ्यांचे युझर आयडी व पासवर्डदेखील दिले होते. प्रवेशपत्रावर डमी उमेदवार ओळखू येऊ नये यासाठी छायाचित्राचे मॉर्फिंगदेखील करण्यात येत होते. शिवाय ई-आधारच्या माध्यमातून बोगस ओळखपत्रदेखील तयार करण्यात आली होती.इतर कोचिंग क्लासेसवरदेखील होता संशय नीट परीक्षेतील सीबीआयने नागपुरातील पाच कोचिंग क्लासेसवर काही दिवसांअगोदर छापे टाकले होते. यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. इतर कोचिंग क्लासेसदेखील सीबीआयच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभाग