बलात्काराच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:37 IST2019-04-08T13:32:47+5:302019-04-08T13:37:31+5:30
महिलेचे अश्लील फोटो काढून करायचा ब्लॅकमेल

बलात्काराच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक
नवी मुंबई - दिघा येथील राष्टवादीचा माजी नगरसेवक रामआशिष यादव याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनीअटक केली आहे. न्यायालयाने त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिघा परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने रामआशिष यादव विरोधात बलात्काराची तक्रार केली होती. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यादवने पीडित महिलेचे अश्लील फोटो काढले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मागील काही महिन्यांपासून यादव या महिलेचे लैंगिक शोषण करत होता. त्यामुळे या महिलेने रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करताच त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे शनिवारी रात्री यादवला अटक केली असून न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले. रामआशिष यादव हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक असून परिसरात त्याच्या दहशतीची देखील चर्चा आहे.
नवी मुंबई - बलात्काराच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 8, 2019