अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 02:45 PM2021-10-21T14:45:54+5:302021-10-21T14:46:56+5:30

NCB summons actress Ananya Pandey : ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार असल्याची शक्यता आहे. 

NCB summons actress Ananya Pandey; Will Suhana Khan also get stuck due to the chat? | अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार?

अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार?

Next
ठळक मुद्दे अनन्याला NCBने समन्स बजावून आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ती अद्याप हजर झालेली नाही. 

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान  (Aryan Khan) क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drug Case) आर्थर रोड तुरुंगात आहेत. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) एनसीबीच्या रडारवर आली आहे.गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी छापा टाकला. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले होते. NCBच्या पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर अनन्याला NCBने समन्स बजावून आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ती अद्याप हजर झालेली नाही. 

तसेच मुंबई हायकोर्टाने आर्यनच्या जामिनासाठी २६ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. अनन्या पांडे सोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार असल्याची शक्यता आहे. 

 

 

Read in English

Web Title: NCB summons actress Ananya Pandey; Will Suhana Khan also get stuck due to the chat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app