Aryan Khan Drug Case : मोठी बातमी...! आर्यन खान ड्रग्सच्या धंद्यात सामील, NCBचा दावा; जामिनाला केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 14:46 IST2021-10-13T14:46:00+5:302021-10-13T14:46:17+5:30
"आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे."

Aryan Khan Drug Case : मोठी बातमी...! आर्यन खान ड्रग्सच्या धंद्यात सामील, NCBचा दावा; जामिनाला केला विरोध
मुबंई - नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आज न्यायालयात आपला जबाब दाखल केला आहे. याचबरोबर, NCB ने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनालाही विरोध केला आहे. आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे. (Aryan is involved in the drug business - NCB)
आर्यन खानवर कॉन्ट्राबँडच्या खरेदीसाठी वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही, तर मर्चेंटकडून मादक पदार्थदेखील जप्त करण्यात आले आहे. तसेच, परदेशातील व्यवहारांशी संबंधित तपास केला गेला पाहिजे आणि तो केलाही जात आहे, असे एनसीबीने म्हटले आहे. आता न्यायालय आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामिन याचिकेवर दुपारी 2:45 वाजता पुन्हा सुनावणी करेल. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सी सिंह न्यायालयात येण्याची शक्यता आहे.
इम्तियाज खत्रीची पुन्हा चौकशी -
NCB ने मुंबई क्रूज शिप ड्रग्स प्रकरणात चित्रपट निर्माता आणि वांद्रे येथील बिल्डर इम्तियाज खत्रीला चौकशीसाठी बोलावले आहे. त्याला एनसीबीने तिसऱ्यांदा बोलावले आहे. मंगळवारी इम्तियाज खत्रीची एनसीबीने तीन तास चौकशी केली आणि नंतर त्याला सोडून दिले होते. त्याचे तपशीलवार निवेदन अद्याप नोंदवलेले नसल्यामुळे त्याला पुन्हा हजर राहावे लागणार आहे.
एनसीबीने आर्यन खानवर लावलाय अवैध ड्रग्स विक्रीचा आरोप -
एनसीबीने असेही म्हटे आहे, की शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने क्रूझ शिपवर ड्रग्जचे सेवन केले. हा नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम, 1985 नुसार भारतात गुन्हा आहे. एनसीबीने आर्यन खानवर बेकायदेशीरपणे डग्स विकण्याचा आणि ठेवण्याचा आरोप केला आहे.