शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

एनसीबीची कारवाई: ड्रग्जच्या विक्रीतून दहशतवादासाठी फंडिंग, १,५०० कोटींचा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 1:25 AM

एनसीबीने गुरुवारी डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत गँगस्टर परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाणला घनसोली येथून अटक केली. त्याच्या चौकशीतून वरील धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्याकडून डायरी जप्त करण्यात आली.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्जची विक्री करत दहशतवादासाठी हवालामार्गे फंडिंग करत असल्याची धक्कादायक माहिती एनसीबीच्या चौकशीतून समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांत हस्तकांनी तब्बल १,५०० कोटींचे ड्रग्ज विकले आहे. यात, शुक्रवारीही एनसीबीने डोंगरीत छापे टाकून आणखी एका हस्तकाला अटक केली.एनसीबीने गुरुवारी डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत गँगस्टर परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाणला घनसोली येथून अटक केली. त्याच्या चौकशीतून वरील धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्याकडून डायरी जप्त करण्यात आली. या डायरीतून दाऊदच्या देशभरातील कनेक्शनचा लेखाजोखा असल्याचेही समोर आले. यात, ड्रग्ज तस्करीसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागली असून, अनेक तस्करांचे आणि सेवन करणाऱ्यांची नावे समोर आली. यामध्ये काही उद्योगपती आणि सेलिब्रिटींच्याही नावाचा समावेश आहे. यांच्याकडेही एनसीबी लवकरच चौकशी करेल.गेल्या अनेक महिन्यांपासून दाऊदला या ड्रग्ज विक्रीतून हवालामार्गे पैसे पाठविण्यात येत होते. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

दहशतवादासाठी ही फंडिंग सुरू होती. गेल्या पाच वर्षांत तब्बल १,५०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची विक्री करण्यात आली आहे. शुक्रवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पुन्हा डोंगरी परिसरात ४ ठिकाणी छापे टाकले. यात दाऊदच्या ड्रग्स अड्ड्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. दाऊदच्या आणखी एका हस्तकला अटक केल्याचा दावा वानखेडे यांनी केला. 

दाऊदच्या हस्तकांच्या संपत्तीवरही येणार टाच- ड्रग्स तस्करी करुन दाऊदच्या हस्तकांनी कमावलेली संपत्तीबाबतही तपास सुरु असून त्यावरही लवकरच कारवाई करणार असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले. गोल्ड स्मगलिंगची चेन तोडल्यानंतर दाऊदने ड्रग्जचा धंदा सुरू केला. - मुंबईतून दाऊदची ड्रग्जच्या धंद्यातील दहशत संपवणार असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. याच कारवाईमुळे वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोTerrorismदहशतवादDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी