Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत समीर वानखेडेंचं FIR

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:09 PM2022-08-16T13:09:35+5:302022-08-16T13:11:43+5:30

समीर वानखेडे मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष जातपडताळणीने समितीने काढला आहे.

Nawab Malik: Nawab Malik's problems increased, Sameer Wankhede's FIR under Atrocities Act | Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत समीर वानखेडेंचं FIR

Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत समीर वानखेडेंचं FIR

Next

मुंबई - क्रुझ ड्रग प्रकरणी (Cruise Drug Case) शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्याप्रकरणी चांगलेच चर्चेत आलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी (Nawab Malik) जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र, जातपडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांनी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यानंतर, आता समीर वानखेडे आक्रमक झाले असून नवाब मलिक यांच्याविरुद्ध त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. 

समीर वानखेडे मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष जातपडताळणीने समितीने काढला आहे. त्यानंतर, समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलिसांत माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात फिर्याद दिली होती. त्यानुसार, मलिक यांच्याविरुद्ध एससी,एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी, पुढील तपास गोरेगाव पोलिसांकडून केला जाणार आहे. मात्र, सध्या मनी लाँड्रींगप्रकरणी नवाब मलिक हे तुरुगांत आहेत. त्यामुळे, या गुन्ह्यासंदर्भात मुंबई पोलिस मलिकांची तुरुंगात जाऊन चौकशी करणार का, त्यांची कोठडी मागणार का हे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत. 

वानखेडेंविरुद्ध चौघांनी केली होती तक्रार

आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. इतकेच नाही, तर समीर वानखेडे यांनी जात बदलल्याचा दावा करत नवाब मलिक यांच्यासह चौघांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळवताना समीर वानखेडे यांनी आपली खोटी जात सांगितल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. ते धर्माने मुस्लीम आहेत, असा दावा मलिक यांनी केला होता. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. 

समितीने तक्रार फेटाळून लावली

समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. तसेच यासंदर्भात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे समितीने ही तक्रार फेटाळून लावली आहे. समितीने ९१ पानी निकालपत्रात स्पष्ट केले आहे. या निकालानंतर वानखेडे यांनी सत्यमेव जयते, असे ट्विट केले. हा समीर वानखेडे यांच्यासाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या तपासाविषयी अनेक दोषारोप झाले होते. नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरले होते. 
 

Web Title: Nawab Malik: Nawab Malik's problems increased, Sameer Wankhede's FIR under Atrocities Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.