शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नवी मुंबई महापालिकेची वेबसाईट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 9:52 PM

नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट हॅक झाल्याची घटना बुधवारी घडली. संध्याकाळच्या सुमारास काहींना वेबसाईट वर "सोनिक" चे संदेश दिसू लागले.

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट हॅक झाल्याची घटना बुधवारी घडली. संध्याकाळच्या सुमारास काहींना वेबसाईट वर "सोनिक" चे संदेश दिसू लागले. हि बाब निदर्शनास येताच वेबसाईट वरील संदेश हटवून वेबसाईट पुन्हा पूर्ववत करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली.बुधवारी देशभरातील काही शासकीय वेबसाईटवर हल्ला होणार असल्याचे केंद्राकडून सायबर पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार नवी मुंबई सायबर सेलकडून दोन्ही परिमंडळ उपायुक्तांना याची कल्पना देऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयांना कळवण्याचे सांगण्यात आले होते.बुधवारी संध्याकाळच्या सुमारास नवी मुंबई महानगर पालिकेची वेबसाईट हॅक झाल्याची बाब उघडकीस आली. वेबसाईट उघडताच त्यावर "सोनिक" असा संदेश दिसत होता. त्यावरून वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्याचे दिसून आले. महापालिकेकडून सध्या कर भरणा तसेच इतर विविध सुविधा ऑनलाईन पुरवल्या जात आहेत. त्यामुळे पालिकेच्या वेबसाईटवर करदात्यांचा डेटा आहे. हॅकर ने हा डेटा चोरला असल्याची अथवा वेबसाइटवरून उडवला असल्याची शक्यता आहे. दरम्यान वेबसाईट हॅक झाल्याचे निदर्शनास येताच पालिका अधिकाऱ्यांनी वेबसाईट पूर्ववत करण्याच्या कामाला सुरवात केली. मात्र वेबसाईट हॅक झालेली नसून फक्त क्रॅक झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेबसाईटवरील इतर लिंक व ऍप्लिकेशन सुरक्षित असल्याचीही खात्री पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाcyber crimeसायबर क्राइमNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी