गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 21:07 IST2020-10-21T21:07:06+5:302020-10-21T21:07:44+5:30
Drug Case : २४ हजार रुपयांचा गांजा सह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक
मीरारोड - भाईंदरच्या गोल्डन नेस्ट परिसरात गांजा विकण्यास आलेल्या मेरी गणेश पवार ( ३८ ) रा . भाटला देवी मंदिर जवळ, दहिसर पूर्व हिला २४ हजार
रुपयांचा गांजा सह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनीअटक केली आहे.
नवघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांना, एक महिला गांजा विकण्या करता गोल्डन नेस्ट परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलीस पथक
पाठवून सापळा रचला होता. त्यावेळी मेरी हि आली असता तिच्या कंदील प्लास्टिक पिशवी मध्ये १२०० ग्रॅम इतका गांजा सापडला . पोलिसांनी तिला अटक केली असून तिचा मोबाईल जप्त केला आहे . तिच्यावर अमली पदार्थ अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदव्यात आला असून नवघर पोलीस पुढील करत आहेत.