राष्ट्रीय खो-खो खेळाडू बलात्कार प्रकरण: मदतीची याचना करत असल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 06:39 PM2021-09-14T18:39:57+5:302021-09-14T20:27:41+5:30

National Kho-Kho player rape case : या क्लिपमध्ये ती काकुळतीला येऊन मदतीसाठी याचना करत आहे आणि किंचाळत आहे. 

National Kho-Kho player rape case: Audio clip of police pleading for help | राष्ट्रीय खो-खो खेळाडू बलात्कार प्रकरण: मदतीची याचना करत असल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

राष्ट्रीय खो-खो खेळाडू बलात्कार प्रकरण: मदतीची याचना करत असल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

Next
ठळक मुद्देपोलिसांना या घटनेदरम्यानच या तरुणीने केलेल्या फोनकॉलची ४१ सेकंदाची ऑडिओ क्लिपही हाती लागली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत. यासोबतच, एसओजी आणि स्कॉडही तैनात करण्यात आली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील साकीनाका येथे घडलेली बलात्काराची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशमध्ये एका राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडूच्या बलात्काराची घटना घडली होती. बिजनौर रेल्वे स्थानकावजळ रेल्वे ट्रॅकवर तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांना आतापर्यंत अनेक पुरावे तथा धागेदोरे सापडले आहेत. पोलिसांना या घटनेदरम्यानच या तरुणीने केलेल्या फोनकॉलची ४१ सेकंदाची ऑडिओ क्लिपही हाती लागली आहे. या क्लिपमध्ये ती काकुळतीला येऊन मदतीसाठी याचना करत आहे आणि किंचाळत आहे. 

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडूच्या हत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी शासकीय आदेशानुसार, हत्येचा तपास रेल्वे पोलिसांकडून स्थानिक पोलिसांना देण्यात आला आहे. यानंतर, बिजनौरचे पोलीस अधीक्षक डॉ.धर्मवीर सिंह यांनी या हत्येच्या तपासाची जबाबदारी शहरचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण रंजन यांच्याकडे सोपवली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत. यासोबतच, एसओजी आणि स्कॉडही तैनात करण्यात आली आहे.

पोलिसांना घटनास्थळाहून एक जेवणाचा डबाही सापडला होता. त्या डब्यात दीड पोळी आणि भाजी होती. पोलिसांनी हा डबाही ताब्यात घेतला आहे. यावरील बोटांचे ठसे घेऊन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर हरवलेल्या मोबाईलचं लोकेशनही ट्रेस केलं आहे. घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरील आदमपूर गावापर्यंत गेल्यानंतर हा मोबाईल बंद करण्यात आला आहे.

मोबाईल बंद केलेल्या ठिकाणाजवळ पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या कंबरेवर काही नखांच्या जखमा आढळल्या आहेत. ही व्यक्ती रेल्वे स्थानकावर खतांची, सिमेंटची पोती आणि इतर माल मालगाडीवर चढवण्या-उतरवण्याची कामं करतो. सध्या पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत. लवकरच या घटनेचा उलगडा केला जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. या घटनेची गंभीरता पाहता शासनानं मुरादाबादचे डीआयजी शालभ माथूर यांना जिल्ह्यातच राहण्याचे आदेश दिले आहेत.

डीआयजी शालभ माथूर यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्याचप्रमाणे तरुणीच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली. तिच्या ओळखीच्या एका तरुणाकडून एक मोबाईल रेकॉर्डिंग मिळालं आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारेही पोलीस तपास करत आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला तरुणी जोरजोराने किंचाळत मदतीची याचना करत आहे. या ऑडिओमध्ये ती सौरभ, अंकल आणि शुकर असं म्हणत आहे. पोलिसांनी सौरभ नावाच्या अनेक युवकांची चौकशी केली. 

Web Title: National Kho-Kho player rape case: Audio clip of police pleading for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.