नाशिक बस आग: मामी तू झोपू नकोस... मॅसेजचा टोन वाजला अन.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 05:46 IST2022-10-09T05:46:04+5:302022-10-09T05:46:32+5:30

मुंबईला परत जाताना पूजासोबत तिचा आतेभाऊ गणेश लांडगेही सोबत होता.

Nashik bus fire: Mami you don't sleep... the tone of the message rang an mami survieved | नाशिक बस आग: मामी तू झोपू नकोस... मॅसेजचा टोन वाजला अन.... 

नाशिक बस आग: मामी तू झोपू नकोस... मॅसेजचा टोन वाजला अन.... 

धनंजय कपाले । 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नाशिक येथे चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून झालेल्या भीषण अपघातामधून वाशिम येथील माहुरवेस परिसरातील रहिवासी पूजा मनोज गायकवाड (२७) ही महिला आपल्या दोन चिमुकल्यांसह सुदैवाने वाचली. निमित्त होते फक्त भाच्याच्या मॅसेजची घंटी. या मॅसेजच्या घंटीमुळे पूजा जागी असल्याने  बाहेर पडण्यासाठी धावाधाव करता आली.

 पतीचे निधन झाल्यानंतर ती मुलासह मुंबईला आपल्या आईसोबत राहून मजुरीचे काम करते. नवरात्री व दसरा या सणानिमित्त पूजा ही आपल्या चिमुकल्यासह वाशिमला आली होती. मुंबईला परत जाताना पूजासोबत तिचा आतेभाऊ गणेश लांडगेही सोबत होता. पूजा झोपेत असताना तिच्या मोबाइलवर भाच्याचा मॅसेज आला. त्यात भाच्याने तिला गुड मॉर्निंगचा मॅसेज करून जागीच राहा. चोरी जाण्याच्या घटना खूप घडत आहेत. त्यामुळे गाढ झोपू नको असा संदेश देत होता. या संदेशाच्या देवाणघेवाणीमुळे पूजा जागी होती.

Web Title: Nashik bus fire: Mami you don't sleep... the tone of the message rang an mami survieved

टॅग्स :Nashikनाशिक