शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

Breaking : नरेंद्र मेहता यांना उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:52 PM

बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या आरोपांखाली दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी मेहतांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

ठळक मुद्देनरेंद्र मेहतावर मीरारोड पोलीस ठाण्यात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) व अन्य कलमांअन्वये गुन्हा दाखल केला आहे. मेहता राजकारणात उतरुन २००२ च्या पालिका निवडणूकीत मेहता अपक्ष म्हणून निवडणूक लढले व जिंकले. लग्न व पीडिता गर्भवती असल्याची माहिती असून देखील मेहतांनी १६ जानेवारी २००३ रोजी सुमन सिंगसोबत दुसरे लग्न केले.

मुंबई - माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा मिळाला आहे. २० मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याची २० मार्चपर्यंत मुदत हायकोर्टाने दिली आहे. बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या आरोपांखाली दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी मेहतांनी हायकोर्टात धाव घेतली होती.मागासवर्गीय महिलेस लग्नाचे आमिष दाखवून गरोदर ठेवणे व मुल जन्मास घालणे, सत्ता व पदाच्या धाक धमकीने सतत लैंगिक शोषण करणे आदी प्रकरणी मीरा भाईंदर भाजपाचे वादग्रस्त नेते, माजी आमदार नरेंद्र मेहतावर मीरारोड पोलीस ठाण्यात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) व अन्य कलमांअन्वये गुन्हा दाखल केला आहे. मेहतांचा साथीदार संजय थरथरेसुद्धा आरोपी आहे. पोलीस मेहतांच्या बंगल्यावर अटक करण्यासाठी गेले असता ते पसार झाले होते. विधी मंडळाच्या चालू अधिवेशनात मेहतांच्या महिला नगरसेविकेच्या शोषणचा मुद्दा गाजला होता व गृहमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. दरम्यान आपल्यावर लावलेला आरोप आणि गुन्हा रद्द करण्यासाठी मेहताने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मेहतांना हायकोर्टाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. 

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारपीडित महिला नगरसेविकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मेहता यांनी लग्नाचे आमिष दाखवून गोड बोलून महिला व तिच्या कुटुंबीयांशी जवळीक साधली. पण पीडिता ही मागासवर्गिय असल्याने उघडपणे लग्नास नकार देत १३ जून २००१ रोजी मेहताने व पिडीतेशी डहाणू येथील मंदिरात लग्न केले. घरचे जातीमुळे लग्नास होकार देणार नाहीत म्हणून योग्य वेळ आली की सर्वांसमक्ष लग्न करु असे आश्वासन दिले. मंदिरात लग्न झाले असल्याने आता आपण पती पत्नी आहोत सांगून मेहता यांनी इच्छेविरुध्द शारीरीक संबंध ठेवले. मेहता राजकारणात उतरुन २००२ च्या पालिका निवडणूकीत मेहता अपक्ष म्हणून निवडणूक लढले व जिंकले.

त्याच दरम्यान पीडित महिला मेहतांपासून गर्भवती राहिली. पण राजकिय कारकिर्दीवर परिणाम होईल म्हणून लग्न व गरोदर असल्याची बाब लपवून ठेवण्यास मेहता यांनी सांगितले. लग्न व पीडिता गर्भवती असल्याची माहिती असून देखील मेहतांनी १६ जानेवारी २००३ रोजी सुमन सिंगसोबत दुसरे लग्न केले. २२ मार्च २००३ रोजी पिडीता बाळंत झाली. पण नगरसेवक आणि दुसरे लग्न झाल्यानंतर मात्र मेहता यांनी पीडित महिला व नवजात बाळाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. जातीचा प्रश्न तसेच राजकिय कारकिर्दीवर विपरीत परिणाम होईल म्हणून लग्न व मुलास स्वीकारण्यास नकार देत शिवीगाळ केली. पण त्यानंतर देखील नगरसेवक पद व सत्तेचा धाक तसेच पीडितेस मारहाण करुन बाळासह मारुन टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण सुरुच ठेवले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कारpregnant womanगर्भवती महिलाMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर