महिलेची हत्या करुन जाळणाऱ्यास नालासोपारा येथून अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 21:54 IST2019-01-21T21:51:46+5:302019-01-21T21:54:22+5:30

काशिमीरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता.

Nalasopara, who was killed by the woman, was arrested by Nalasopara | महिलेची हत्या करुन जाळणाऱ्यास नालासोपारा येथून अटक  

महिलेची हत्या करुन जाळणाऱ्यास नालासोपारा येथून अटक  

ठळक मुद्दे १६ जानेवारी रोजी वरसावे जवळील जंगल भागात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. नालासोपाऱ्याच्या श्रीराम नगर मध्ये राहणारी निर्मला सचिन यादव ( मुळ नाव निर्मला शंकर धोनकर ) वय - ४७ असल्याचे निष्पन्न झाले.

मीरारोड - अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेने लग्नासाठी तगादा लावल्याने तीच्या डोक्यात दगड घालुन हत्या केल्यावर तीचा मृतदेह जाळून पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने नालासोपारा येथुन सोमवारी अटक केली आहे. १६ जानेवारी रोजी वरसावे जवळील जंगल भागात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. काशिमीरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजीत टेलर सह वेळे, शिंदे, पोशिरकर, गर्जे, थापा, चव्हाण, वाडिले आदिंच्या पथकाने तपास सुरु केला. महिले कडील एका अर्धवट जळालेल्या व्हिजीटींग कार्ड वरील नंबर वरुन ती नालासोपाऱ्याच्या श्रीराम नगर मध्ये राहणारी निर्मला सचिन यादव ( मुळ नाव निर्मला शंकर धोनकर ) वय - ४७ असल्याचे निष्पन्न झाले.

विवाहीत निर्मलाचे नाला सोपारयाच्या बिलाल पाडा भागातील अबरार मोहम्मद असलम शेख (२७)याच्याशी गेल्या वर्षभरा पासुन अनैतिक संबंध होते. निर्मलाने लग्न करण्यासाठी तगादा लावला होता.१५ जानेवारी रोजी निर्मला मैत्रीणीच्या मुलाच्या लग्नासाठी पुण्याला जाण्यास निघाल्याची माहिती मिळताच अबरारने लग्नाची बोलणी करु म्हणुन तीला ठाण्यावरुन परत फाऊंटन हॉटेल जवळ बोलावुन घेतले. बोलण्याच्या बहाण्याने तीला रस्त्या पासुन सुमारे २५ फुट आतील जंगलात नेले. तेथे तीचा गळा आवळुन व डोक्यावर दगड मारुन हत्या केली. नंतर तीच्याच बॅगमधील कपडे व पाला पाचोळा एकत्र करुन तीला जाळून टाकले. 

Web Title: Nalasopara, who was killed by the woman, was arrested by Nalasopara