नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:46 IST2025-12-19T19:44:59+5:302025-12-19T19:46:42+5:30
नेपाळी आरोपी मायदेशी पळून जात असताना आवळल्या मुसक्या

नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): सख्ख्या भावाचा खून करुन नेपाळला पळून जाणाच्या तयारीत असलेल्या दुसऱ्या नेपाळी आरोपी भावाला शिताफीने पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले. शुक्रवारी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
वसईच्या तुंगारफाटा येथील डॉल्फीन हॉटेल येथे राहणाऱ्या योगेश मोहनबहादूर नेपाली (३५) याचा नात्याने सख्खा भाऊ असलेला आरोपी सुरज मोहनबहादूर नेपाली (३०) याच्यासोबत गुरुवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला. यावरून आरोपीने भावाला धक्का मारुन जमिनीवर पाडले, लाथाबुक्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याचा खून केला. पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणा केल्यावर तो मायदेशी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानंतर त्याला शिताफीने आरोपी सुरज मोहन बहादूर नेपाली याला अटक केली.