म्हैसूरमधील अपघातात नागपूरच्या शिक्षिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:19 IST2020-02-22T00:18:35+5:302020-02-22T00:19:38+5:30
म्हैसूर येथील अपघातात नागपूरच्या युवा शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी म्हैसूरमध्ये अनियंत्रित ट्रकची बसला धडक बसल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले होते.

म्हैसूरमधील अपघातात नागपूरच्या शिक्षिकेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म्हैसूर येथील अपघातात नागपूरच्या युवा शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी म्हैसूरमध्ये अनियंत्रित ट्रकची बसला धडक बसल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले होते. या अपघातात जैन मंदिर सदरजवळ राहणाऱ्या शिरीन रवी फ्रान्सीस (२६) यांचा मृत्यू झाला आहे. शिरीन बंगळुरूमध्ये शिक्षिका होती. अपघाताच्या वेळी ती बसमध्ये बसली होती. तिच्या मृत्यूची माहिती कळताच शहरातील ख्रिश्चन समुदायात दु:खाची लाट पसरली. शिरीनचे शिक्षण नागपुरातच झाले आहे. ती हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या कुटुंबात आईवडील आणि भाऊ आहे. शिरीनचा मृतदेह नागपुरात आणल्यानंतर रविवारी सकाळी ११ वाजता जरीपटका कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येतील.