शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

नागपूर : भूमाफिया धापोडकरने तहसीलदारांचीही केली फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 22:27 IST

पोलिसांकडे जंत्री; नवे गुन्हे दाखल होणार 

ठळक मुद्देपोलिसांकडे जंत्री; नवे गुन्हे दाखल होणार 

नागपूर : उत्तर नागपुरातील कुख्यात भूमाफिया संजय धापोडकर आणि त्याच्या साथीदारांच्या पापाची जंत्री पोलिसांनी जमविली आहे. चौकशीत धापोडकर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांनी तहसीलदारांचीही फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे धापोडकर टोळीविरुद्ध पुन्हा नवे गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.गँगस्टर रंजित सफेलकरसोबत हात मिळवणी करून एका शेतकऱ्याचे अपहरण केल्यानंतर त्याला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन धापोडकरने १६ एकर जमीन हडपली. तसंच त्यावर अनधिकृत लेआउट टाकून शेकडो जणांना भूखंड विकले. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये गोळा करून अनेकांची फसवणूक केली. या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी धापोडकरला अटक केल्यानंतर त्याच्या विरुद्ध अनेक जण तक्रारीसाठी पुढे आले आहेत. दरम्यान, धापोडकरने आपल्या साथीदाराच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची मान्यता मिळवण्यासाठी ठिकठिकाणच्या तहसीलदारांचीही दिशाभूल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा पोलिस करीत आहेत. त्याच्या संबंधाने आलेल्या तक्रारीचीही शहानिशा पोलीस करत असून लवकरच धापोडकरविरुद्ध नवे गुन्हे दाखल होण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या सूत्रांनी वर्तविली आहे.लोकमतच्या वृत्ताने खळबळधापोडकर सध्या कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध नव्याने गुन्हे दाखल होऊ नये म्हणून धापोडकरचे साथीदार प्रयत्नशील आहेत. ते संभाव्य तक्रारदारांना धमक्या देऊन आणि आमिष दाखवून गप्प करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकमतने आज यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर संबंधित वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरPoliceपोलिस