हत्याकांडाचं रहस्य उलगडणार; पैलवान सुशीलच्या निकटवर्तीयाने सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:10 PM2021-05-12T16:10:42+5:302021-05-12T16:13:38+5:30

Wrestler Sagar Dhankhar murder case : आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी भुरा कुस्तीपटूने सुशील कुमारसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

The mystery of the murder will be revealed; A close associate of wrestler Sushil said, "What happened that night?" | हत्याकांडाचं रहस्य उलगडणार; पैलवान सुशीलच्या निकटवर्तीयाने सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं?

हत्याकांडाचं रहस्य उलगडणार; पैलवान सुशीलच्या निकटवर्तीयाने सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं?

Next
ठळक मुद्दे५ मे रोजी २३ वर्षांचा युवा मल्ल सागर धनकड़ याने जबर मारहाणीनंतर इस्पितळात प्राण गमावले होते.सुशील कुमारच्या जवळच्या भुरा या पैलवानाची पोलिसांनी मंगळवारी चौकशी केली.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात हरियाणाच्या कुस्तीपटूची हत्या झाली आणि पोलिसांच्या हाती न लागलेला ऑलम्पिक पदक विजेता सुशील कुमार अद्यापही फरार आहे. या प्रकरणी पोलिसांकडूनसुशील कुमारचा शोध सुरू आहे.  दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिकची दोन पदके जिंकणारा मल्ल सुशील कुमार याच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे.  सुशील कुमारच्या जवळच्या भुरा या पैलवानाची पोलिसांनी मंगळवारी चौकशी केली. आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी भुरा कुस्तीपटूने सुशील कुमारसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

५ मे रोजी २३ वर्षांचा युवा मल्ल सागर धनकड़ याने जबर मारहाणीनंतर इस्पितळात प्राण गमावले होते. याशिवाय सागरचे चार मित्र गंभीर जखमी झाले. यात सुशीलसह अनेक जण आरोपी आहेत.  या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आणखी काही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सुशील कुमार अद्यापही फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. भुरा कुस्तीपटूची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी सुशील कुमारने भुराला भांडण झाल्याचं कळवलं. त्यावेळी भुरा घटनास्थळी पोहोचला तेव्हा सागरचा आधीच मृत्यू झाला होता. त्यानंतर हरिद्वारला सोडण्यास भुराला सांगण्यात आलं. पोलिसांनी आरोपींकडून चार कार आणि काही सामान ताब्यात घेतलं आहे. 

 

मुंबईत खळबळ! महिलेचे लैंगिक शोषण करून गळा चिरून हत्या; नाल्यात आढळला मृतदेह 

 

याप्रकरणी पोलीस पुढील तपास हरिद्वारला जाऊन करणार आहेत तिथे पोलिसांना सुशीलचं शेवटचं लोकेशन मिळालं होतं.  दिल्ली पोलिसांना सुशील आणि त्याच्या साथीदारांचा एक आठवड्यानंतरही त्याचा सुगावा लागला नाही. पोलिसांचे पथक पाच राज्यात त्याचा शोध घेत आहेत. सुशीलसह पोलिसांनी त्या दिवशी उपस्थित १७ जणांची यादी तयार केली आहे. त्या आधारेच सर्वांचा शोध घेण्यात येत आहे.

सुशील कुमार म्हणतो...
‘ते आमचे पैलवान नव्हते, मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की, काही अनोळखी व्यक्तींनी आमच्या परिसरात शिरकाव करीत भांडण केले. आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काही संबंध नाही’.

कोण आहे सुशील?
सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव मल्ल आहे. ३७ वर्षीय सुशील कुमारने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि त्याआधी २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्याला २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आले होते.

Web Title: The mystery of the murder will be revealed; A close associate of wrestler Sushil said, "What happened that night?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app