अविवाहित इसमाची घरात रहस्यमय हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 12:04 IST2021-06-24T12:02:43+5:302021-06-24T12:04:36+5:30

Crime News : सकाळी त्यांचा मृतदेह घरातच आढळला. अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आहेत.

Mysterious murder of unmarried personal in house, police rushed to the spot, investigation is underway | अविवाहित इसमाची घरात रहस्यमय हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू

अविवाहित इसमाची घरात रहस्यमय हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू

गडचिरोली : येथील गजबजलेल्या फुले वार्डात एका अविवाहित इसमाची त्याच्याच घरात रहस्यमय हत्या झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. दुर्योधन रायपुरे (48 वर्ष) असे मृत इसमाचे नाव आहे.

रायपुरे हे अविवाहित असून घरात एकटेच राहात होते. त्यांचा पार्टनरशिपमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय होता. समाजकार्याची त्यांना आवड असल्याने 4 वर्षापूर्वी लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी नगर परिषदेची निवडणूकही लढली होती.

घरालगतच राहणाऱ्या भावांच्या कुटुंबियांकडून रायपुरे यांना जेवण आणून दिले जात होते. सकाळी त्यांचा मृतदेह घरातच आढळला. अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आहेत. एक काठी आणि अनोळखी चप्पलही आढळली. 

एसडीपीओ प्रणिल गिल्डा, ठाणेदार प्रमोद बाणबले यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाने आरमोरी मार्गाकडील शेतापर्यंतचा रस्ता दाखवला. त्यामुळे आरोपी तेथून एखाद्या वाहनाने पसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: Mysterious murder of unmarried personal in house, police rushed to the spot, investigation is underway