My mental condition is not right; Mansukh had given such letters to Thane, Mumbai Police Commissioner | "माझी मानसिक स्थिती ठीक नाही"; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील 'त्या' स्कोर्पिओ मालकांनी लिहिलं होतं पोलीस आयुक्तांना पत्र

"माझी मानसिक स्थिती ठीक नाही"; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील 'त्या' स्कोर्पिओ मालकांनी लिहिलं होतं पोलीस आयुक्तांना पत्र

ठळक मुद्देमानसिक स्थिती ठिक नसल्याबाबत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मनसुख हिरण यांनी लेखी पत्र दिले असल्याचीही माहिती समोर येत आहे.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी आज आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गुरूवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मनसुख हिरण यांचा मुलगा नेहमीप्रमाणे दुकानात जेवणाचा डब्बा घेवून आला. जेवण उरकून साडे आठच्या सुमारास मुलाला दुकानातच थांबवून मनसुख यांनी मी बाहेर जाऊन येतो असे सांगून दुचाकीवरून गेले होते, अशी माहिती त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या स्कॉर्पिओ कारबाबतकारमालकाची पोलीस चौकशी सुरु होती. मात्र, मानसिक स्थिती ठिक नसल्याबाबत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मनसुख हिरण यांनी लेखी पत्र दिले असल्याचीही माहिती समोर येत आहे.

 

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी आज आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. तसेच आजच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज सकाळी १०.२५ मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला. नौपाडा पोलिस ठाण्यात आज दुपारी मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. मात्र, मनसुख यांचा संशयास्पद मृत्यूमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.  

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा चेसिस क्रमांक आणि इंजीन क्रमांक घासून काढण्यात आला होता. मात्र, वाहन जुने असल्यामुळे काचेवर असलेल्या क्रमांकावरून तिची ओळख पटली होती. तपासात ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती समोर आली. याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे परिसरात राहणारे मनसुख हिरण यांची ही स्कॉर्पिओ असल्याचं तपासात आढळून आलं. 

 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार मालकाचा आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?, चर्चेला उधाण

 

लॉकडाऊनमुळे कार बरेच दिवस बंद होती. दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाउस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारच्या सुमारास ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे तेथीलच सर्विस रोडवर ती पार्क करून मनसुख पुढे निघून गेले. १८ फेब्रुवारी रोजी कार पार्क केलेल्या ठिकाणी गेल्यावर कार तेथे नसल्याने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. स्कॉर्पिओ जुनी असल्यामुळे जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपऱ्यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. आरोपींनी वाहनाची ओळख पटू नये म्हणून कारचा चेसिस आणि इंजीन क्रमांक घासला होता. पण, काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती.

Web Title: My mental condition is not right; Mansukh had given such letters to Thane, Mumbai Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.