'माझा पती गर्लफ्रेन्डसोबत पळून गेला, शोधणाऱ्याला बक्षीस...', पत्नीची पोस्ट झाली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 11:55 IST2022-09-14T11:50:54+5:302022-09-14T11:55:05+5:30

Crime News : महिलेने सांगितलं की, मुलांच्या शिक्षणासाठी ते गाव सोडून आलोटला आले होते. मी पंचायतमध्ये सहायक सचिव पदावर गेल्या सात वर्षांपासून काम करते.

My husband ran away with girlfriend wife announce reward in Ratlam MP | 'माझा पती गर्लफ्रेन्डसोबत पळून गेला, शोधणाऱ्याला बक्षीस...', पत्नीची पोस्ट झाली व्हायरल

'माझा पती गर्लफ्रेन्डसोबत पळून गेला, शोधणाऱ्याला बक्षीस...', पत्नीची पोस्ट झाली व्हायरल

MP Crime News : मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये तिच्या पतीला शोधून आणणाऱ्या व्यक्तीला ती बक्षीस देणार असल्याचं तिने सांगितलं. महिलेने हेही लिहिलं की, तिचा पती बदमाश आहे. तिचा पती दोन लाख रूपये कॅश, दागिने आणि बाइक घेऊन आपल्या गर्लफ्रेन्डसोबत पळून गेल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरवलिया सोलंकी हा विक्रमगढ आलोट इथे राहणारा व्यक्ती आहे. तो एका तरूणीला घेऊन 17 ऑगस्टला फरार झाला. तो सोबत दोन लाख रूपये कॅश, दागिने आणि बाइक घेऊन गेला. त्याच्या पत्नीने 5 सप्टेंबरला पती आणि त्याच्या गर्लफ्रेन्ड विरोधात तक्रार दाखल केली होती.

महिलेने सांगितलं की, मुलांच्या शिक्षणासाठी ते गाव सोडून आलोटला आले होते. मी पंचायतमध्ये सहायक सचिव पदावर गेल्या सात वर्षांपासून काम करते. आम्हाला दोन मुलं आहेत. माझ्या पतीचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. ज्यावरून अलिकडे आमच्यात खूप भांडणे होत होती. माझा पती मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. काही दिवसांपूर्वीच तो घरातील दागिने, बाइक, पैसे घेऊन मला आणि माझ्या मुलांना सोडून गर्लफ्रेन्डसोबत फरार झाला. 

त्याला शिक्षा देण्यासाठी मी फेसबुक पोस्ट केली. ज्यात लिहिलं की, 'माझा पती विक्रम तरूणींना जाळ्यात फसवतो. तो एका तरूणीसोबत पळून गेला आहे. त्याने आपली पत्नी आणि दोन मुलांना सोडलं आहे. याची सूचना देऊन माझी मदत करा आणि साध्या-भोळ्या मुलींचं जीवन संपण्यापासून वाचवा. माझा पती फार बदमाश आहे'.

तेच याप्रकरणी आलोट एसडीओपी सवेरा अंसारी म्हणाले की, काही दिवसांआधीच एका महिलेने तिचा पती एका तरूणीसोबत पळून गेल्याची तक्रार दाखल केली होती. पतीवर तिने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचाही आरोप केला होता. प्रकरणाची चौकशी केली जात आहे. लवकरच आरोपीला पकडलं जाईल.

Web Title: My husband ran away with girlfriend wife announce reward in Ratlam MP