Muzaffarpur Shelter Home Case : अखेर माजी मंत्री मंजू वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 21:43 IST2018-11-15T21:41:44+5:302018-11-15T21:43:26+5:30
जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी आरोपांचं खंडण करताना मंजू वर्माने बालिकाश्रमात झालेल्या बलात्कारा कांड प्रकरणी राजीनामा दिला होता आणि आता पक्षाने देखील कारवाई केल्याचा खुलासा केला.

Muzaffarpur Shelter Home Case : अखेर माजी मंत्री मंजू वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी
पाटणा - बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिकाश्रमात झालेल्या बलात्कारा कांड प्रकरणी राज्याच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांची जेडीयू पक्षाने अखेर हकालपट्टी केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला ब्रजेश ठाकूर आणि मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्वर वर्मा यांचे संबंध असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून मंजू वर्मा यांच्यावर विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत होता. त्यानंतर मंजू यांनी पदाचा राजीनामा देखील दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाने मंजू यांच्या अटकेचे आदेश दिल्यानंतर जेडीयूने पक्षातून निलंबित केले आहे. मंजू वर्मा बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात फरार आहे. जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी आरोपांचं खंडण करताना मंजू वर्माने बालिकाश्रमात झालेल्या बलात्कारा कांड प्रकरणी राजीनामा दिला होता आणि आता पक्षाने देखील कारवाई केल्याचा खुलासा केला.