शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

इंदापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा वार करुन खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 5:43 PM

पूर्ववैमनस्यातून हॉटेलचालक तरुणासह त्याच्या कामगारावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवत त्याचा खून करण्यात आला.

ठळक मुद्देतणावपूर्ण वातावरण : जुन्या भांडणाचा मनात राग धरून हत्त्या

इंदापूर : पूर्ववैमनस्यातून हॉटेलचालक तरुणासह त्याच्या कामगारावर धारदार हत्यारांनी हल्ला चढवत त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास इंदापूरमधील आयटीआय जवळ घडली. या घटनेत तरुणाचा कामगार जखमी झाला आहे. त्याच्या मोटारसायकलला मोटार आडवी घालून हा हल्ला करण्यात आला असून चार ते पाच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बाळासाहेब दत्तात्रय शेलार (वय २४, रा. कासबापेठ, इंदापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. कामगार जावेद शेखहा गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात प्रविण दत्तात्रय शेलार (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे.सुमित रघुनाथ जामदार याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०१८ च्या पहिल्या आठवड्यात प्रविण शेलारचे निलेश मल्हारी बनसुडे (रा. कसबा पेठ, इंदापूर) व त्याच्या मित्रांसोबत पुर्ववैमनस्यातून भांडणे झाली होती. त्यावेळी बनसुडे याने फिर्यादीच्या पोटात चाकु मारला होता. झटापटीत बनसुडे याच्याही हाताला चाकू लागला होता.दोघांनाही इंदापूरच्या शासकीय दवाखान्यात उपचारांसाठी नेण्यात आले होते. प्रवीणचा भाऊ बाळासाहेब हा रुग्णालयात आल्यावर बनसुडेच्या अंगावर धाऊन गेला होता. भांडणे सोडवित असताना सुमित रघुनाथ जामदार (रा. कसबा पेठ, इंदापूर), सोमनाथ मच्छिंद्र चव्हाण (रा. मोडनिंब, सोलापूर) यांनाही बाळासाहेब याच्याकडून मार लागला होता. यासंदर्भात त्याने जमादारची माफीही मागीतली होती. चव्हाण काही दिवस कोमामध्ये होते. भांडणे झाल्यानंतर दिवाळीच्या दिवसात फिर्यादी व बाळासाहेब शहाबाज राजू शेख (रा. रामवेस, इंदापूर) असे रामवेस चौकात उभे असताना जामदार याने,   ‘तु माझा मावस भाऊ सोमनाथला मारले आहेस. त्यामुळे त्याच्या दवाखान्याला १० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. ते पैसे मी खर्च केले आहेत. ते तु मला दे नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही!  तुला कायमचा संपवेन आणि मी माझ्या बाजुने पुरावे गोळा करून सही सलामत बाहेर सुटेन’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास हॉटेल कामगार शेख याने फिर्यादीला फोन करुन सरस्वतीनगर येथे आयटीआय समोर जामदार व अनोळखी ४ ते ५ इसम यांनी स्कॉर्पिओ सारख्या गाडी आडवी घालून धारदार हत्यारांनी दोघांवर वार केल्याचे सांगत  लवकर येण्यास सांगितले. फिर्यादीने मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावले. त्यावेळी बाळासाहेब हा रक्ताचा थारोळयात पडलेला दिसला.  दोघांनाही इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, बाळासाहेब याचा उपचारांपुर्वीच मृत्यू झाला होता.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे करीत आहेत. ......................... इंदापूर शहरामध्ये दोन दिवस तणावपूर्ण वातावरण रविवारी सायंकाळी ६. ४५ वाजता घटना झाल्यानंतर, ७ वाजता इंदापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मयत आणल्यानंतर २०० ते ३०० तरुणांनी एकच गर्दी केली  होती. त्यानंतर सोमवारी सकाळी इंदापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरो पींना त्वरित अटक करण्यात यावी यासाठी इंदापूर पोलीस ठाण्यात ४०० ते ५०० तरुणांची व मयताच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे इंदापूर शहरात दोन दिवस तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. 

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसMurderखून