हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’; तीन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 19:17 IST2021-07-20T19:16:51+5:302021-07-20T19:17:40+5:30

Murder Case : प्राप्त माहितीनुसार, मृतक दिगांबर आणि आराेपी संदीप राऊत यांच्यात जूना वाद होता.

Murdered and body dumped on railway ‘tracks’; Three accused arrested | हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’; तीन आरोपींना अटक

हत्या करुन मृतदेह फेकला रेल्वे ‘ट्रॅकवर’; तीन आरोपींना अटक

ठळक मुद्दे दिगांबर नामदेव कन्नाके (रेल्वे) (५०) असे मृतकाचे नाव आहे.

वर्धा : जुन्या वादातून व्यक्तीला तिघांनी रॉडने मारहाण करीत हत्या करुन मृतदेह वरुड रेल्वे लाईनवर फेकून दिला. ही घटना १८ रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. असून मंगळवारी याचा उलगडा झाला असून तिन्ही आरोपींना दहेगाव पोलिसांनीअटक केली. दिगांबर नामदेव कन्नाके (रेल्वे) (५०) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक दिगांबर आणि आराेपी संदीप राऊत यांच्यात जूना वाद होता. तीन दिवसांपूर्वी दिगांबर हा शेतातील कामे आटोपून घराकडे जात असताना आरोपी संदीप राऊत. राजू राऊत आणि किशोर राऊत यांनी रस्त्यात अडवून दिगांबरला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.तसेच त्याच्या डोक्यावर रॉडनेही मारहाण केली. दरम्यान, आरोपींनी जखमी दिगांबरचा मृतदेह वरुड रे. परिसरात असलेल्या रेल्वे पटरीवर फेकून दिला. याचा तपास दहेगाव पोलिसांनी केला असता ही सर्व बाब उघड झाल्याने आरोपींना हत्येचा गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना अटक केली.
 

सेवाग्राम पोलीसात मर्ग दाखल
मृतक दिगांबर याचा मृतदेह वरुड रेल्वे परिसरातील रेल्वे लाईनवर फेकून देण्यात आला होता. ही बाब सेवाग्राम पोलिसांना समजताच पोलिसांनी अनोळखी मृतदेह असल्याने याबाबतचा मर्ग दाखल केला होता. मात्र, दहेगाव पोलिसांच्या कारवाईने हा मृतदेह दिगांबरचा असल्याचे समजले.

Web Title: Murdered and body dumped on railway ‘tracks’; Three accused arrested