लातुरमध्ये चाकू हल्ल्यात तरुणाचा खून; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 13:39 IST2020-10-26T13:39:18+5:302020-10-26T13:39:50+5:30
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. कल्याण नेहरकर करीत आहेत.

लातुरमध्ये चाकू हल्ल्यात तरुणाचा खून; दोघांना अटक
लातूर : शहरातील विक्रम नगर येथे क्षुल्लक कारणावरून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी शाहू कापसे (रा. प्रकाश नगर, लातूर) यांचा मुलगा अशोक कापसे (26) रविवारी रात्री उशिरा आपल्या मित्राला घेऊन विक्रम नगर येथे गेला होता. याचदरम्यान अजय पिसाळ आणि विजय पिसाळ यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून त्याची बाचाबाची झाली. नंतर याचे पर्यावसान चाकू हल्ल्यात झाले. यात अशोक कापसे याचा मृत्यू झाला तर मित्र मोहित हा गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. कल्याण नेहरकर करीत आहेत.