एकतर्फी प्रेमातून, चारित्र्यावर संशय घेऊन तरुणीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 20:35 IST2019-11-23T20:18:37+5:302019-11-23T20:35:25+5:30
धारदार हत्याराने केला वार; तरुणास अटक

एकतर्फी प्रेमातून, चारित्र्यावर संशय घेऊन तरुणीचा खून
पिंपरी : एकतर्फी प्रेम करून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन धारदार हत्याराने गळ्यावर वार करून तरुणीचा खून केला. भोसरीतील लांडगेनगर येथे शनिवारी (दि. २३) सकाळी सव्वानऊ ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन जयसिंग चौहान (वय २२), असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. बरकत खलील अल (वय २०, रा. लांडगेनगर, भोसरी, मूळ रा. डुबडीयाही, पो. खजोली, जि. मधुबनी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत सुमन हिचा भाऊ रोहित जयसिंग चौहाण (वय २४, रा. अष्टविनायक गल्ली, सद्गुरुनगर, भोसरी, मुळगाव रा. बरौत, ता. हंडीया, जि. इलाहाबाद) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी रोहित चौहान यांची बहीण सुमन ही भोसरतील लांडगेनगर येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होती. आरोपी बरकत हा सुमन हिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सुमन शनिवारी कंपनीत कामावर असताना आरोपी बरकत याने घरातील भाजी कापण्याच्या धारदार चाकून वार केला. यात सुमन हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी धारदार चाकू जप्त केला असून, आरोपी बरकत याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.