गळा चिरुन तरुणाचा खून ;देहूगाव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 13:09 IST2018-10-13T13:07:21+5:302018-10-13T13:09:20+5:30
गळा चिरुन तरुणाचा खून करण्यात अाल्याची धक्कादायक घटना देहूत घडली अाहे. पाेलीस अाराेपींचा शाेध घेत अाहेत.
_201707279.jpg)
गळा चिरुन तरुणाचा खून ;देहूगाव येथील घटना
पिंपरी : देहूगाव येथील गाथा मंदिराजवळ 21 वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह रात्री 11 च्या सुमारास आढळून आला. गळा चिरून खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गणेश बलभीम बनगर असे तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बनगर हा रुपी हाऊसिंग सोसायटी रुपीनगर येथील रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री श्रीमंत भैरवनाथ चौकात त्याचा मृतदेह पाेलिसांना अाढळून अाला. गळ्यावर, तसेच शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या. अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा खून केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पूर्व वैमनस्यातून की आणखी काही कारणास्तव खून झाला, याबाबत देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला, त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गेल्या काही दिवसात शहरात खून सत्र सुरू आहे. शुक्रवारी दुपारी भोसरीत रिक्षाचालकाचा खून झाला, ही घटना ताजी असतानाच रुपीनगरच्या तरुणा चा खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.