पिंपरीत धारदार शस्त्राने तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 16:41 IST2019-03-29T16:40:53+5:302019-03-29T16:41:16+5:30

धारदार हत्याराने वार करुन तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली

The murder of a young man with a sharp weapon | पिंपरीत धारदार शस्त्राने तरुणाचा खून

पिंपरीत धारदार शस्त्राने तरुणाचा खून

पिंपरी : धारदार हत्याराने वार करुन तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली. जुबेर गुलाब मुजावर (१९, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील गुलाब मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.  याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने एका अल्पवयीन मुलाला जेरबंद केले आहे. 
 वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बालाजी कॉलेज कडे जाणाऱ्या  रस्त्यावर ताथवडे येथे एक तरुण बेशुद्ध पडला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहचले. जुबेर हा जखमी आवस्थेत आढळून आला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. जुबेर याच्या डोक्यात, मानेवर आणि पोटात धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत.  वाकड पोलीस तपास करत आहेत.

Web Title: The murder of a young man with a sharp weapon