सांगलीत सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 11:28 IST2020-07-12T11:27:14+5:302020-07-12T11:28:25+5:30

कवठेपिरान येथील घटना

Murder of a young man out of anger over running away from his sister and getting married in Sangli | सांगलीत सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

सांगलीत सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

सांगली : बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून कवठेपिरान (ता. मिरज) येथे युवकाचा गुप्तीने वार करून खून करण्यात आला. ओंकार माने (वय २२) असे मृताचे नाव असून निखिल सुधाकर सुतार (२१) असे संशयिताचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहा महिन्यापूर्वी ओंकार माने यांनी निखिलच्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केला होता. त्यानंतर काही दिवसांनी तो गावात राहण्यास आला. याचा निखिलला राग होता शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ओंकार एका ठिकाणी थांबला असताना निखिलने त्या ठिकाणी येऊन त्याच्यावर गुप्तीने वार केला. अतिरक्तस्त्रावमुळे ओंकारचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित निखिल स्वतः सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला.

Web Title: Murder of a young man out of anger over running away from his sister and getting married in Sangli