मस्करीची झाली कुस्करी; किरकोळ वादावरून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 09:03 PM2019-07-12T21:03:57+5:302019-07-12T21:07:54+5:30

विरार पोलिसांनी आरोपी तरुणा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहे. 

The murder of a young man on a minor issue | मस्करीची झाली कुस्करी; किरकोळ वादावरून तरुणाची हत्या

मस्करीची झाली कुस्करी; किरकोळ वादावरून तरुणाची हत्या

Next
ठळक मुद्देमृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. आरोपी पळाला असून त्याचा शोध घेत पोलीस तपास करत आहे. 

नालासोपारा - विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील बियर शॉपीसमोर पायरीवर गुरुवारी रात्रीच्या सुमारास दारू पित बसलेल्या दोन तरुणांमध्ये चेष्टामस्करी वरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. विरारपोलिसांनी आरोपी तरुणा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहे. 

विरारच्या पूर्वेकडील फुलपाडा रोडवरील जनकपूरधाममधील जय भवानी चाळीमधील सदनिका नंबर ४ मध्ये राहणारा केतन रामणारायन मंडल (२७) हा गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बाजूलाच असलेल्या आय जोशी बियर शॉपमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. बाजूलाच असलेल्या गाळ्याच्या पायरीवर केतन आणि आरोपी अमित तोमार हे दोघे बियर पित बसलेले असताना चेष्टामस्करी चालू होती. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाल्यावर अमितने दारुच्याच नशेत केतनला शिविगाळ करत हाताने त्याच्या तोंडावर, नाकावर आणि पोटात फाईट मारल्याने त्याच्या नाकातोंडातून रक्त आले व त्याला तोंडावर जमिनीवर पाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. तेव्हापासून आरोपी पळाला असून त्याचा शोध घेत पोलीस तपास करत आहे. 

Web Title: The murder of a young man on a minor issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.