बाचाबाची झाल्याच्या रागातून डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 21:01 IST2018-11-02T20:59:40+5:302018-11-02T21:01:02+5:30

बाचाबाची झाल्याच्या रागातून एका तरुणाचा डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला. ही घटना डुडुळगाव येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

The murder of young boy at Dighi | बाचाबाची झाल्याच्या रागातून डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून

बाचाबाची झाल्याच्या रागातून डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून

पिंपरी : बाचाबाची झाल्याच्या रागातून एका तरुणाचा डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला. ही घटना डुडुळगाव येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

                  प्रदीप शांताराम तळेकर (वय ३१, रा. वेताळवाडी, डुडुळगाव. ता. हवेली. जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिताराम विठोबा वहिले (रा. चिंचवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) या आरोपीला अटक केली आहे. पालीस निरिक्षक ए.बी. जोंधळे यांनी दिलेली माहिती अशी, सिताराम व प्रदीप एकाच परिसरात रहायला असून एकमेकांच्या ओळखीचे होते. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते डुडुळगाव येथील एका मोकळया मैदानात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली याचे रुपांतर वादात झाले.

               दरम्यान, सिताराम याने प्रदीप यांच्या डोक्यात फरशी मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी फरार झाला.   प्रदीप यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघीपोलिसांनी आरोपी सिताराम याला अटक केली आहे.  अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: The murder of young boy at Dighi