the murder of women by stone heat on head in chakan | चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून महिलेचा डोक्यात पाटा घालून निर्घृण खून 
चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून महिलेचा डोक्यात पाटा घालून निर्घृण खून 

ठळक मुद्देगुन्हा दाखल, आरोपीला अटक

चाकण : चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून एका महिलेची डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज ( शुक्रवारी दि. १९ ) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. कल्पना शितोळे असं मृत महिलेचे नाव आहे. या खूनप्रकरणी अनिल हेंद्रे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या वादातून ही हत्या झाली. कल्पना याच वादातून आज सकाळी शेजारी राहणाऱ्या अनिल यांच्या घरी गेल्या होत्या. तिथे झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि अनिल यांनी कल्पना यांच्या डोक्यात पाट्याने प्रहार केला. यात कल्पना यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी आरोपी अनिलला अटक केली आहे. 
----------


Web Title: the murder of women by stone heat on head in chakan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.