लॉजमध्ये गळा कापून महिलेची हत्या, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:52 IST2019-01-27T20:25:39+5:302019-01-28T13:52:31+5:30
वाशीतील संकल्प लॉजमध्ये महिलेची गळा कापून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

लॉजमध्ये गळा कापून महिलेची हत्या, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार
नवी मुंबई - वाशीतील संकल्प लॉजमध्ये महिलेची गळा कापून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंदा सुखदारे असे मयत महिलेचे नाव आहे. संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती तिला घेऊन लॉजमध्ये आलेला. मात्र थोड्या वेळाने सदर व्यक्ती घाईमध्ये लॉजमधून निघून गेल्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता, आतमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. गळा कापून तिची हत्या करण्यात आलेली आहे. मारेकरूची ओळख पटली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वाशी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.