शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

बुलडाण्यात अनैतिक संबंधातून महिलेची तिच्या दोन मुलींसह हत्या; आरोपीला कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 3:42 AM

मुलींचे मृतदेह विहिरीत, तर महिलेचा हौदात

मोताळा (बुलडाणा) : आईसह दोन मुलींची हत्या केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा बु. येथे गुरुवारी उघडकीस आली. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दादाराव अंबादास म्हैसागर (३८, रा. पिंपळखुटा बुद्रुक) यास न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुमनबाई शंकर मालठाने या पती व दोन मुलींसह पिंपळखुटा बुद्रुक येथे राहत होत्या. त्यांची मुलगी राधा हिच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे राधा ही अंदाजे आठ-दहा वर्षांपासून माहेरी वास्तव्यास होती. दुसरी मुलगी शारदा हिचा घटस्फोट झाल्याने तीसुद्धा दीड-दोन वर्षांपासून आई-वडिलांकडे राहत होती.

मालठाणे कुटुंब आरोपी दादाराव म्हैसागर याच्या शेतात मजुरीने काम करण्यासाठी जात होते. यातूनच आरोपी आणि विधवा राधा मालठाणे यांचे सूत जुळले. त्यातून राधा हिला गर्भधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा सोक्षमोक्ष लावा, असा तगादा राधाने दादाराव म्हैसागर याच्याकडे लावला होता. त्यामुळे विवाहित असलेला दादाराव म्हैसागर हा हादरला. दादाराव म्हैसागर यास चार मुले आहेत. अनैतिक संबंध चव्हाट्यावर येऊ नये यासाठी त्याने मायलेकींची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. सुमनबाई यांचा मृतदेह पाण्याच्या हौदात तर दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीत फेकले होते.आरोपी वाढण्याची शक्यतातिन्ही मायलेकींची हत्या आपणच केल्याची कबुली दादाराव म्हैसागर याने पोलिसांकडे दिली आहे; मात्र तिन्ही मायलेकींची हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणे एकट्याचे काम नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

 

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून